हिमायतनगर : नागोराव शिंदे :
महाराष्ट्र राज्याच्या हिंगोली लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यातील तुफानी शिवसैनिक मुबंईत होत असलेल्या दसरा महोत्सवाच्या निमित्ताने सदरचे रिंगन गाजवून दाखविण्यासाठी व विरोधकाच्या उरात धडकी भरविण्यासाठी जिल्ह्यातुन शेकडो शिव सैनिक दसरा मेळाव्याला म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होत असलेल्या मुबंईतील मेळाव्याला गेल्यामुळे येथे मोठे शक्ती प्रदर्शन खासदार हेमंत पाटील हे दाखवून दिले यावेळी घोषणा बाजी ही करण्यात आली आहे
मुंबई येथे शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी खासदार हेमंत पाटिल लोकनाथ एकनाथ १८ डब्ब्यांच्या विशेष रेल्वे एक्सप्रेसने जवळपास तीन हजार शिवसैनिक कुर्ला लोकमान्य टर्मिनल्स रेल्वे स्थानका वरून गेले आहेत शिवसैनिका समवेत बि.के.सी मैदानावर पाच किलो मीटरच अंतर पार करत पोहचले असल्यामुळे मुबंई खासदाराचे शक्ती प्रदर्शन लक्ष वेधी ठरले आहें
शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगात कायदेशीर लढा सुरू आहे. दुसरी लढा जमिनीवर सुरू आहे. त्यादृष्टीनं शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे
दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या वाटचालीला महत्त्व प्राप्त झाले असून खासदार हेमंत पाटील आमदार संतोष बांगर आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विचारांच सोन लुटण्यासाठी केलेल हे शक्ती प्रदर्शन लक्षवेधी ठरत आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसऱ्याला दोन मेळावे होत आहेत. या दोन्ही मेळाव्यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. कोणाचा मेळावा अधिक भव्यदिव्य होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यासाठी दोन्ही गटांनी मेळाव्यासाठी ताकद लावली आहे.

0 Comments