माधव पवार
नांदेड जिल्हाच्या हिमायतनगर तालुका एक तर लोहा तालुक्यात तीन जनाचा वीज पडून मृत्यू तर दोघे जन जखमी झाले असल्याची घटना दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी घडल्या आहेत लोहा तालुक्यातील धावरी तांडा शिवारात ऊस तोड कामगार काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून तीन जन मृत्यू पावले आहे
हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा येथे तीन मजुराच्या अंगावर सोयाबीनवर फारी झापत असताना वीज पडून एक ठार झाला तर दोन जन जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत या दोन्ही तालुक्यात पाऊस व विजेचा धुमाकूळ होऊन चार जणांचा बळी गेला तर दोघे जन जखमी झाले आहे
लोहा तालुक्यातील धावरी तांडा येथे विजेचा कडकडाट असताना सदरचे मजूर एका झाडाखाली बसले होते अशी माहिती मिळाली असून यात माधव पिराजी डुबूकवाड ४६ वर्ष राहणार पानभोसी तालुका कंधार मोतीराम शामराव गायकवाड वय ४७ वर्ष पेठ पिंपळगाव तालुका पालम जिल्हा परभणी आणि १० ते १२ वर्षाची मुलगी रुपाली पोचीराम गायकवाड या दोन्ही बाप लेकरावर व अन्य एकावर काळाचा घाला पडला आहे
वादळी वाऱ्यासह तुफानी पाऊस आणि विजेचा धुमाकूळ सुरू झाला तेव्हा सिबदरा येथील शेत शिवारात सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यावर वीज कोसळली त्यात वारगंटाकळी येथील मयत शेतकरी सुनील साहेबराव वायकोळे वय ३४ वर्ष हा सोयाबीन काढणीसाठी सिबदरा येथे गेले होते

0 Comments