Header Ads Widget

मध्यवर्ती बँक नायगाव शाखे अंतर्गत अतिवृष्टी अनुदान वाटपाचा तहसीलदार गजानन शिंदे च्या हस्ते शुभारंभ !!

विशेष नायगाव प्रतिनिधी :  बाळासाहेब पांडे :- 

खरीप हंगामातील माहे जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान भाजप,बाळासाहेबांची शिवसेना सरकार व  राज्य शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले होते ते अनुदान खात्याला जमा करून या अनुदानाचे वाटप नायगाव शाखेत तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
  
 नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस अनुदानाची रु. ६८६.४५  कोटी रक्कम बँकेला प्राप्त झाली असून नायगाव शाखेला १७ कोटी ८८लाख प्राप्त झाल्याने येथील बँकेच्या १९,९,१९ इतक्या खातेदाराच्या नावे रक्कम जमा करण्यातआली आहे
अतिवृष्टी अनुदान वाटपाचा शुभारंभ तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी जि. प.सदस्य माधवराव बेळगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास चव्हाण,प्रा.रवींद्र वसंत चव्हाण, पोनि अभिषेक शिंदे,शिवराज वरवटे, वंजारवाडीचे चेअरमन पंडित पाटील, बेंद्री चे चेअरमन हणमंतराव कदम,आदी उपस्थित होते.   
 बँकेचे विभागीय अधिकारी आनंदराव मोरे यांनी प्रास्ताविक केले यावेळी बोलताना श्रीनिवास चव्हाण म्हणाले की ज्या शेतकऱ्यांकडे रुपे डेबीट कार्ड (ए.टी.एम. कार्ड) आहे अशा शेतक-यांनी ए. टी. एम. मधून रक्कम उचल करावी व ज्या शेतकऱ्यांकडे रुपे डेबीट कार्ड (ए. टी. एम. कार्ड) नाहीत अशा शेतकऱ्यांना ठरवुन दिलेल्या गावांच्या क्रमवारीनुसार येऊन उचल करावी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. बँकेचे कर्मचारी रात्रंदिवस परिश्रम घेवून शेतकऱ्यांना दिपावली सणाच्या अनुदानाचे वाटप करीत आहेत.   
  दि १८ ऑक्टोबरपासून हे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होऊन जिल्हा बँकेकडून वाटप सुरु करण्यात आले आहे. जिल्हा बँकेच्या नायगाव शाखेमधून ३५ गावच्या  १९९१९  खातेदार शेतकऱ्यांना वाटपास सुरुवात केलेली आहे. खातेदार शेतकऱ्यानी बँकेला सहकार्य करावे असे शाखाधिकारी बालाजी हिंगोले, विजय पाटील शिंदे,शेख खयूम,शिवाजी गुमटे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments