Header Ads Widget

नायगाव तालुक्यात मुसळधार पाऊस; हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान दिवाळीत दिवाळे निघण्याची आली वेळ !!

विशेष नायगाव प्रतिनिधी  : बाळासाहेब पांडे - 
       
नायगाव तालुक्यात मंगळवारी दुपारी सायंकाळी साडे तीन पाच च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन ज्वारी सह इतर शेती पिकांचे  प्रचंड नुकसान झाले आहे अनेकांच्या सोयाबीनच्या गंजीत ही पाणी घुसले आहे. सोयाबीन च्या कडप्प्या पाण्यात भीजत आहेत. तर काहींच्या शेतीला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.या  मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतीसह शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे                                    
यंदाचा पाऊसकाळा शेतकऱ्यांसाठी सुरुवाती पासूनच  नुकसान कारक राहिला सुरुवातीस  कमी अधिक पावसामुळे पेरण्या खोळंबल्या, तर जिथे पेरणी झाली  तिथे दुबार  तीबार पेरणी करून ही झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान केलेले आहे

शेतकऱ्यांना शेतीत केलेला लागवड खर्च ही वापस येण्या जोगे नसताना आता पीक काढायच्या वेळात सातत्याने रोजनिशी होत असलेल्या  पावसामुळे हाती तोंडाशी आलेले पीक ही आता घरा पर्यंत येईल का नाही याची खात्री नाही. यामुळे यंदाची दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न येथील शेतकरी वर्गा पुढे निर्माण झाला आहे.     
अशाच नैराश्यातून गेल्या दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील नरंगल येथील शेतकर्‍यां ने आपली जिवन यात्रा संपवली याच शेतकऱ्यां बाबत ही स्थिती आहे असे नाही तर तालुक्यातील बहुतांश शेतकरीवर्गा ची हीच गत आहे. यामुळे येथील शेतकर्‍यांची पीक विम्याच्या येणार्‍या पैशाकडे ही मोठी आस लागली आहे.

 अशातच सदर नुकसानीची तक्रार नोंदवण्यासाठी  पीक विमा कंपनीचे  काही केल्या फोन ही लागत नाहीत इपिकपेरा करण्या साठी आणि पीक विमा कंपनी कडे तक्रार करण्या साठी ऑनलाइन ऍप ही चालत नसल्याने शेतकरी बेचैन झाले आहेत.

Post a Comment

0 Comments