Header Ads Widget

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल शुल्लक कारण विळ्यानी केला वार ? माळ इकळी येथील घटना

नायगाव : मधुकर जवळे -

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माळ इकळी येते एका झालेल्या शुल्लक  कारणावरून ठाण्यात एका च्या विरोधात आहे ॲट्रॉसिटीचा  गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचे शुल्लक कारण म्हणजे लिंबाची काडी तोडल्याचे कारण समोर करून झालेल्या बाचाबाचीच्या भांडणात जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली असून विळ्याने वार करण्यात आलेला विळा कोणाचा ? हा महत्त्वाचा प्रश्न असला तरी विळ्याने केलेली जखम स्पष्ट पणे दिसत आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजे माळ इकळी येथे गावा लागतच असलेल्या शेतात सदरची बाचाबाची झाली यावेळी सदरच्या वादातील व ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी विठ्ठल संभाजी पुयड यांचे शेत असल्यामुळे या शेतात एक लिंबाचे झाड असल्याचे सांगण्यात येते

आणि या लिंबाची काडी दाताला लावण्यासाठी तोडून घेतल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याची तक्रार कुंटूर पोलीस ठाण्यात देण्यात आली सदर हा प्रकार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी सात आठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे
कुंटूर पोलीस ठाण्याच्या  पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या इकळी माळ येथे गेल्या अनेक दिवसा पासून चालत असलेल्या गायरानाच्या मुद्या वरून पूर्वी  दहा ते बारा जनावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता 

माळ इकळी प्रकरणात  दिनांक ३० सप्टेंबर रोजी येथे दुसरी ॲट्रॉसिटी दाखल करण्यात आली यातील फिर्यादी माधव गंगाराम कांबळे यांनी दिलेल्या तक्रारी वरून कुंटूर ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला  सदरील तपास चालू आहें 


 

Post a Comment

0 Comments