किरण हणमंते
बरबडा :- बरबडा येथे नवरात्र महोत्सवा निमित्त श्री लोकमान्य दुर्गा मंडळाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी रात्री लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबु पा. शिंदे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रवि सुरेवाड, चक्रधर पा. शिंदे, राजेश आलमवाड श्री. लोकमान्य दुर्गा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सुरणे, उपाध्यक्ष ऋषिकेश आलमवाड, कोषाध्यक्ष ऋषिकेश नागधरे यांच्या सहित सर्व दुर्गा मंडळाचे सदस्य व नागरिक यांची उपस्थिती होती. यामध्ये श्री स्वामीसाई प्रोडक्शन निर्मित लावणी सम्राट गणेश काकडे प्रस्तुत "नार नखऱ्याची" या लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
यामध्ये भाग घेणारे कलाकार गणेश काकडे यांच्या सहित कु. दिपाली मेटकर नांदेड, सीमांतला तिडके नांदेड, डॉ.दिपाली जुने बुलढाणा, आदिनी उदे ग अंबे उदे, अप्सरा आली, ओ शेठ, नाद खुळा, आता वाजवा कि, नटले तुमच्यासाठी राजसा, प्रितीच्या झूल्यात हलवा, या रावजी बसा भावजी, माय मराठी, या सहित हिंदी सदाबाहर गाण्यांनी सर्वांची मने जिकूंन त्या कलाकारांनी प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवले होते यात हिंदी गीत, बॉलिवूड नृत्याचा अप्सरे सोबतचा नजराणा बघून आनंद घेत होते
हया मंडळाने सामाजिक उपक्रम वीस वर्षांपासून राबविण्यात येत आहे. कोरोना च्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच हा कार्यक्रम होत असल्यामुळे गावातील नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेत होते. दुर्गा मंडळाचे सर्व सदस्य व गावकरी यांना आनंद होत असुन या वर्षी भरगच्च कार्यक्रम होत आहेत.या सर्व कार्यक्रमाला गावाकऱ्यातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
बरबडा येथील नवरात्र महोत्सवानिमित्त येताळेश्वर दुर्गा मंडळाच्या वतीने व्याख्यान मालेचे आयोजन
बरबडा येथील येताळेश्वर दुर्गा मंडळाच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष बरबडा नगरीचे सरपंच माधव कोलगाणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन कुंटूर पोलिस स्टेशन अंतर्गत बरबडा बिट चे जमादार रमेश निखाते हे होते.
तत्पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या व्याख्यान मालेत अविनाश भारती यांनी सर्व महापुरुष यांना वंदन करून कार्यक्रमाला सुरवात केली त्यामध्ये तथागत गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर नतमस्तक होऊन व्याख्यान मालेला सुरवात करून या दोन तासामध्ये सर्व प्रेक्षकांना हसवत प्रबोधन करत कविता आणि व्याख्यान च्या माध्यमातून प्रबोधन करताना लोकांना सर्व श्रेष्ठ माय बाप असल्याचे सांगितले.
खास शैलीत प्रबोधन करीत त्यांनी आपले वेगवेगळे अनुभव सांगितले. त्यांच्या पहाडी आवाजात वामनदादा कर्डक यांची काही गीत सादर केले. काही कविता सुद्धा सादर केल्या त्यानंतर उपदेश करीत एक आदर्श व्यक्ती कसे होऊ यासाठी काय केले
पाहिजे हे पण सांगितले. या दुर्गा महोत्सवा निमित्ताने आपण पर स्त्री चा जर सन्मान केला तर आपण देवी बसविल्याचे सार्थक होईल असे ते म्हणाले.या दोन्हीही कार्यक्रमाला गावाकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद देत तब्ब्ल दोन तीन तास जागेवरून न हलता शांततेत ऐकत होते.


0 Comments