Header Ads Widget

बरबडा येथे ६६ वा धमचक्र प्रवर्तन दिन साजरा


बरबडा :- किरण हणमंते :- 

बरबडा येथे ६६  वा धम्मचक्र प्रवर्तन दिन बरबडा येथील बौध्द समाज मंदिरामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी बरबडा नगरीचे माजी सरपंच नागनाथ हनमंते यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व महामानव परमपुज्य भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि/किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य गौतम हनमंते, बसपा चे जिल्हाउपाध्यक्ष मनोहर ढुमणे, दिपक एडके, मोहन हनमंते, दिलिप हनमंते, व्यंकटी हनमंते, रमेश कांबळे, अविनाश हनमंते, युवकांचे नेतृत्व अक्षयकुमार हनमंते, रामेश्वर आढाव, शिवानंद शिंदे, बालाजी जोगदंड यांच्या सहित बालकांची व उपासक यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments