हिमायतनगर: नागोराव शिंदे -
नांदेड जिल्ह्यातील हदगांव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सदरच्या मतदार संघासाठी गेल्या जुलै जुलै महिन्याच्या ७ तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली होती व शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जाऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले होते या अतिवृष्टीची मदत प्रशासना जाहीर केली होती
परंतु आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नांमुळे या मतदार संघातील शेतकऱ्यासाठी ४२ कोठी ७४ लाखाची मदत जाहीर करण्यात आली असून ही मदत महाराष्ट्रात सर्व अधिक असल्याचे मानले जात आहें
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात मागील काळात सर्वाधिक पाऊस झाल्याने मतदार संघातील शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने अतिवृष्टी नुसकान भरपाई म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त नुकसानीची मदत मिळावी ह्यासाठी प्रयत्न करणारे कार्य सम्राट विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मतदार संघासाठी एकूण ४२ कोटी ७४ लाख ७२ हजार रुपये मंजूर त्याचा धनादेश हिमायतनगर येथील मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक पि जी वाडेकर यांना नुकताच दिला देण्यात आला आहें
यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी असे सांगितले असून मतदार संघातील शेतकरी बांधवास जशी नुकसानीची मदत मिळाली त्याच प्रमाणे पीक विम्याची सुद्धा मदत मिळून देण्यासाठी मी प्रयत्न करेल असे त्यांनी हिमायतनगर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत सांगितले

0 Comments