Header Ads Widget

बरबडा येथील गणेश साहेब शेट्टे नीट परीक्षेत यश

बरबडा :- किरण हानमंते - 

बरबडा येथील रहिवाशी असणारा गणेश साहेब शेट्टे हा जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये अकरावी बारावी चे शिक्षण घेतलेला गणेश साहेब शेट्टे  हा नीट २०२१ - २२ च्या परीक्षेत चांगल्या रितीने पास झाला आहे. बालपणापासून गणेश अत्यंत कुशाग्र बुद्धीचा होता त्याने दहावी बोर्ड मध्ये जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर या शाळेत दहावि पर्यंत चे शिक्षण झाले त्यात त्याने  ९१.२० गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. व बारावीला ९१.६६  गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे

.बारावी परीक्षेत चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने नीट ची परीक्षा दिली . त्या नीट मध्ये झालेल्या परीक्षेत ७२०  पैकी ५९३ गुण घेऊन गणेश ने आपल्या आई वडिलांचे नाव रोशन केले आहे. त्याच्या परिस्थिती मुळे कोणतीही सुविधा नसताना देखील त्याने त्याच्या बुद्धीच्या जीवावर त्याने हा विजय खेचून आणला आहे. त्याला त्यांच्या आईवडील यांचे व  शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले आहे. त्याचे डॉक्टर होण्यासाठी चे प्रयत्न सफल झाले त्याने जिद्दीने व मेहनतीने हे यश प्राप्त केल्याचे सांगितले आहे.

त्याच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे त्याने त्या परिस्थितीतुन मार्ग काढत यश मिळविले आहे. या यशाने त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. एका गरीब कुटूंबातून पुढे जाणे हि खरंच कौतुकास्पद बाब आहे.संपूर्ण  तालुक्यातून व परिसरातून त्याच्या वर्ग मित्रांनी समाजांनी  विविध स्तरावरून त्याच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा याचा  वर्षाव होत आहे..

Post a Comment

0 Comments