माधव पवार
नायगाव मतदार संघ हा तसा पूर्वी पासूनच मागासलेला भाग असल्यामुळे या भागाचा वाटेल तेवढा विकास झाला झाला नाही कारण हा मतदार संघ पूर्वी मुदखेड मतदार संघात होता आता नायगाव मतदार संघात असल्यामुळे काही भागाचा विकास झाला तर काही भागाचा विकास होत नाही या विभागाचे राजकीय मंडळीना विकास म्हणजे काय हे दाखवून देण्यासाठी तसे विकासाच्या माध्यमातून विकास करून दाखवित नसल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे
मतदार संघाचा विकास करणे पुढाऱ्याना शक्य होते परंतु करत नसल्यामुळे नायगाव मतदार संघातील रस्त्याची गेल्या अनेक वर्षा पासून वाट लागली असल्याचे दिसून येत असले तरी या मतदार संघासाठी आलेला पन्नास कोठीचा निधी कागदावर राहू नये असे जनतेचे मत आहे
या ८९ मतदार संघातुन निवडणूक लढवून आमदार झाले झाले याच मतदाराच्या मतदानातुन खासदार झाले मंत्री झाले तरी हा नायगाव मतदार संघ विकासा पासून लांब का ? असा प्रश्न जनतेतून केला असून जात असून या मतदार संघासाठी निधी आला असल्याचे अनेक वेळा जाहीर फलक लावण्यात आले परंतु निधीचा फुसका बार निघाला होता
या वर्षी याच मतदार संघाच्या विकासाठी पन्नास कोठी रुपयाचा निधी मिळाला असल्याचे जाहीर फलक लावण्यात आले परंतु विकास कामे कधी ? करणार असा प्रश्न चर्चेला जाताना ऐकावयास मिळत असला तरी घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यासाठी १३ कोठी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी सदरचा रस्ता सध्या तरी वाऱ्यावर आहे

0 Comments