नायगाव प्रतिनिधी :, बाळासाहेब पांडे -
कोलंबी येथील माजी सरपंच तथा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते. उत्तमराव गवाले यांना नुकताच समाज भुषण पुरस्कार मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.पुरस्कार मिळाल्या बद्दल कोलंबी ग्रामस्थांच्या वतीने आज सायंकाळी साडे पाच वा.कोलंबी ता नायगाव येथे भव्य नागरी सत्काराचे अयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या नागरी सत्कार सोहळ्यात व्यारव्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन सदरचा सायंकाळी ५. ३० वाजता
करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. हनमंत भोपाळे सर (व्याख्याते व साहित्तीक, हे राहणार आहेत
तर प्रमुख व्याख्याते मा.जल नायक बाबुरावजी केंद्रे राष्ट्रीय जल संस्कार मित्र पुरस्कार प्राप्त) यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी शिवराज पाटील होटाळकर,माजी.शिक्षण व अर्थ समिती सभापती जि.प.नांदेड प्रभावतीबाई कत्ते माजी सभापती पं.स. नायगांव,भास्कर दादा भिलवंडे युवा नेते नायगांव विधानसभा,शिवा कांबळे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,बाबूराव बस्वदे काटकळंबा जल रक्षक मा. पंडीत पवळे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक यांची उपस्थिती राहणार आहे.
सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आयोजन समस्त गावकरी मंडळी, कोलंबी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments