Header Ads Widget

समाजाच्या अर्थिक उन्नतीसाठी झटणाऱ्या गोदावरी समुहाचे कार्य प्रेरणादायी संजय पाचपोराची सहकार सूर्य मुख्यालयास सदिच्छा भेट

हिमायतनगर : नागोराव शिंदे  - 

सहकारी संस्था चालवणे कठीण काम असले तरी, समाज माझा आणि मी समाजाचा आहे. आपण समाजाचे देणे लागतो या उदांत हेतूने सहकारी संस्था स्थापन करणे आणि अल्पावधित त्या संस्थेचा पाच राज्यात विस्तार करणे हे गोदावरी परिवाराने करुन दाखवलेले कार्य सहकारी संस्थाच नव्हे तर प्रत्येकांसाठी प्रेरणादाई कार्य असल्याचे सहकार भारती मुंबईचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी येथे केले असून तरोडा नाका नांदेड परिसरात नव्याने उभारलेल्या गोदावरी अर्बन सहकार सूर्यच्या मुख्यालयास संजय पाचपोर यांनी नुकतीच भेट दिली आहे

या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष किशनराव वाडीकर, तेलंगणा व आंध्रप्रदेश सहकार भारतीटे प्रदेश संघटनमंत्री प्रवीण गायकवाड, गंगाधर कोलमवार, नागरी सहकारी बँकेचे संचालक तथा सहकार भारती विभाग प्रमुख रमेश शिंदे  गुरुजी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी भास्कार डोईबळे यांची प्रमुख्याने उपस्थिती होती 

याप्रसंगी गोदावरी अर्बनचे मुख्यालय प्रिंसिपल मॅनेजर विजय शिरमेवार, मुख्य शाखेचे व्यवस्थापक अविनाश बोचरे, वितरण व्यवस्थापक महेश केंद्रे, लेखा व्यवस्थापक प्रशांत कदम प्रशासन व्यवस्थापक गोपाल जाधव यांच्यासह गोदावरी अर्बनच्या मुख्यालयातील व मुख्य शाखेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती 

यावेळी संस्थापक तथा हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील अध्यक्ष राजश्री पाटील आणि संचालक मंडळाच्या वतीने संस्थेचे व्यवस्थापकिय संचालक धनंजय तांबेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सन्मान व स्वागत केले त्या नंतर  तांबेकर यांनी पाचपोर यांना संस्थेच्या कामकाजाच्या संदर्भात थोडक्यात माहिती दिली असून  गोदावरी अर्बन संस्थेतील उच्च शिक्षित अनुभवी कार्यतत्पर अधिकारी व कर्मचाऱ्याशी पाचपोर यांनी संवाद साधला असून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे


Post a Comment

0 Comments