Header Ads Widget

जनतेच्या हितासाठी व विद्यार्थ्यांसाठी आता बस सोडण्यास तयार परंतु पुला वरची जबाबदारी कोण घेणार -सरपंचाचे पत्र द्या - वाहतूक नियंत्रण अधिकारी दळवी

हिमायतनगर नागोराव शिंदे - 

राज्य परिवहन मंडळाची बस जनतेच्या हितासाठी व विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मी कधी ही सोडण्यासाठी तयार असून सदर गावाला जाणाऱ्या रस्त्यावर असलेला पुल हा धोकादायक असल्याने सदरच्या पुलावर काही घटना घडल्यास त्या घटनेला जबाबदार कोण ? असा प्रश्न करीत हिमायतनगर राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रण अधिकारी दळवी यांनी आमच्या नायगाव फास्ट न्यूजच्या तालुका प्रतिनिधीशी संपर्क करून सांगितले आहे

राज्य परिवहन मंडळाचे नियंत्रण अधिकारी दळवी म्हणतात अधिकृत रीत्या बस सोडवण्यासाठी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंचाचे पत्र हिमायतनगर नियंत्रण कंट्रोलला आणून देण्याची गरज भासत असल्याचे ही नियंत्रण अधिकारी दळवी यांनी सांगितले आहे
हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्याशी पत्रकार नागोराव शिंदे यांनी संपर्क करून तालुक्यातील पवना गावा पर्यंत मानव मानव विकास बस जात नाही या संदर्भात विद्यमान आमदाराशी संवाद साधला असता सदरच्या
 आमदारानी बस सोडण्याच्या बाबतीत राज्य परिवहन मंडळच्या अधिकाऱ्याना बोलतो असे सांगितले सदरील रस्त्यावर असलेल्या पुलाचे काम करण्यात आले होते असे आमदारानी हिमायतनगरच्या वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्याच्या निदर्शनास सवांद साधून आणून दिले आहे 

Post a Comment

0 Comments