Header Ads Widget

अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटनेचे मराठा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांना २० हजार रुपयाची खंडणी स्वीकारताना नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी रंगेहात पकडले !!

       माधव पवार
अखिल भरतीय मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी दिनांक ७ सप्टेंबर २०२२ रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे तक्रारदार पंकज लक्ष्मणराव यादव वय ३४ वर्षे व्यवसाय नोकरी मोटर वाहन निरीक्षक नेमणूक प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड राहणार कांचन बंगला नांदेड यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याकडे सविस्तर तक्रार केली केली या तक्रारीत असे म्हटले होते की अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष  विक्रम पाटील बामणीकर यांनी दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयात तक्रारी अर्ज केला होता
प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या कार्यालयात सुद्धा बामणीकर यांनी तक्रार अर्ज देऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या विरोध उपोषणास बसलेले होते ते उपोषणाच्या दरम्यान विनाकारण सदरच्या कार्यालयात येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि सदरचे उपोषण मागे घेण्यासाठी मधला पर्याय काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे 
सदरील कारवाई बाबत माननीय पोलीस उपमान निरीक्षक श्री विसर तांबोळी नांदेड परिक्षेत्र पोलीस अधीक्षक नांदेड प्रमोद कुमार शेवाळे आपण पोलीस अधीक्षक नांदेड श्री निलेश मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा डॉ.सिद्धेश्वर भोरे यांनी ग्रामीणचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक आनंद बिच्छेवार प्रमोद कराळे,संतोष जाधव,प्रभाकर मलादोडे, बालाजी लाडेकर, ज्ञानोबा कवठेकर,शिवानंद कानगुले,विश्वनाथ पवार,चंद्रकांत स्वामी, तपास अधिकारी सपोनि सुरेश थोरात यांचे पोलीस दलातुन विशेष कौतुक करण्यात येत आहे
दिनांक ६ सप्टेंबर २०२२ रोजी सहाय्यक आरटीओ  निमसे यांच्या कडून आम्हास २५  हजार रुपये खंडीची मागणी केली होती सदरच्या तडजोडी अंती वीस हजार रुपये रक्कम देण्याचे ठरले परंतु अधिकाऱ्याना उपोषण कर्त्यास मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांना खंडणी देण्याची अधिकाऱ्याची इच्छा नसल्याने सदरचे अधिकाऱ्यानी माननीय आरटीओ कामत यांना सदर प्रकरणाची माहिती दिली त्यांनी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना सदर घटनेची सविस्तर बाब व माहिती सांगितले असता त्यांनी खंडणी खोरावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोरबांड यांना दिले आहे  



Post a Comment

0 Comments