चोर समजून नागरिकांनी बेदम मारहाण करून आजोळी जाणाऱ्या दोन युवकास जखमी केल्याने जखमीना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केल्याची घटना नायगाव तालुक्यात नायगाव लालवंडी रस्त्यावर नायगाव वाडी शिवारात रविवारी रात्री दहा च्या दरम्यान घडली आहे.
या बाबद अधिक वृत्त असे की जितेंद्र सूर्यवंशी व जैएन्द्र सूर्यवंशी रा.नांदेड हे रात्री उशिरा गाडी न भेटल्याने नायगाव हुन लालवंडी येथे आपल्या आजुळी आपले मामा पंढरी जोंधळे यांच्या कडे जाण्या स्तव निघाले होते. काही लोकांनी त्यांच्या वर पाळत ठेऊन त्यांना रस्त्यात अडवले व मारहान केली.सोशियल मीडियावरून पोलिसांना कळाले
पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे व त्यांची टीम घटनास्थळी गेली.उपस्थित जमावाला पांगवत दोन्ही युवकास नायगाव च्या दवाखानात उपचारार्थ दाखल केले.ही बातमी वाऱ्यासारखी नायगाव शहरात पसरली मोठा जमाव ग्रामीण रुग्णालय येथे जमा झाला.यातून ही मार्ग काढीत दोन्ही युवकास पो.नि .अभिषेक शिंदे व पोलिसांनी पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवले आहे.सध्या पृकृती ठीक असल्याचे कळते
नायगाव तालुक्यात सध्या अफवांचे पेव जास्त सुटत असून परवा सहयोग नगर भागातून लहान बालक गेल्याची अफवा सुटली होती.बालक आजोळी राहत होते तिच्या वडिलांनी त्यास नादेड येथे नेले होते नंतर ते सापडले.मांजरम येथील घटना ही संशयास्पद वाटत असून, तसेच प्रकार प्रत्येक गावात घडत आहेत. काही तरी काल्पनिक अफवा पसरवल्या जात असून विश्वास असेल तर खात्री करूनच नायगाव पोलीस ठाण्याच्या फोन न. 02465- 262133 वर संपर्क करून माहिती कळवावी.मारहाण करणे,आदी बाबी करीत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करूनये असे नायगाव ठाण्याचे पो.नि.अभिषेक शिंदे यांनी आमच्यानायगाव फास्ट न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

0 Comments