माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे वजीरगाव येथील रहिवासी असलेले आठ जुगारी अनधिकृत जुगार खेळत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून बिलोलीचे आयपीएस अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बिटचे जमादार रमेश महोनराव निखते यांच्यासह एम एस कंधारे व होमगार्ड राठोड,मोरे,थेटे यांनी यांनी वजीरगाव येथे जुगार खेळणाऱ्यावर छापा टाकून जुगाराच्या साहित्यासह चार हाजार २७० रुपये ताब्यात पोलिसांनी घेतले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरबडा पोलीस चौकी येते या चौकीचे बिट जेमादार निखते यांनी सदरची धाडसी कारवाई केली करून आरोपी सदरच्या घटनेतील जुगारी आप्पाराव ढगे, दादाराव ढगे, व्यकट ढगे,श्याम ढगे,शेख अमीन,बालाजी ढगे,विठ्ठल ढगे,नामदेव ढगे यांनी विना परवाना जुगार खेळत असताना मिळून आले असून त्याच्या जवळ जुगाराचे साहित्य व रोख चार हाजार २७० रुपये मिळून आले आहेत जेमादार निखते यांच्या फिर्यादी वरून १२ ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक मोहनराव कंधारे करीत आहेत

0 Comments