Header Ads Widget

रातोळी शिवारात शेतकरी महिलेला बसची धडक घटनेत महीला गंभीर जखमी उपचारार्थ नांदेडला दाखल नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -

नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -

रोजचया प्रमाण आपल्या शेतात काम करणाऱ्या अन्य महीला मजूरांना घेऊन दिवसभर काम आटोपून सायंकाळी घराकडे जात असताना पाठीमागून बसने जोराची धडक दिली. या घटनेत सदरील शेतकरी महीला गंभीर जखमी झाली असून उपचारार्थ नांदेड येथे नेले. हा अपघात नरसी-मुखेड रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे 
या बाबद सविस्तर वृत्त असे की पंचफुलाबाई व्यंकटराव माऊलगे(४९ रा. रातोळी ता. नायगाव या आपल्या स्वतःच्या शेतात अन्य काही महीला मजूरासमवेत शेतीचे दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी घराकडे जात असताना पाठीमागून मुखेड आगाराची बस नांदेडहून मुखेडला जात होती मुखेड आगाराची बस  क्रमांक एम एच २० बील१९०९ नांदेडहून मुखेडला जात होती.सदर बसने जोरात धडक दिली आहे 
या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत 
सदर घटनास्थळी त्यांचे कुटुंबातील सदस्य तसेच सरपंच प्रतिनिधी पिराजीराव देशमुख यांनी धाव घेतली. जखमीस तातडीने एका प्रायव्हेट वाहनाने  जीप द्वारे नांदेडला पाठवले अपघात स्थळी नायगाव पोलीसानी भेट देऊन पंचनामा केला असून सदरचा अपघात हा रातोळी शिवारात शेतकरी महिलेला बसची धडक घटनेत महीला गंभीर जखमी उपचारार्थ नांदेडला दाखल करण्यात आल्याची माहिती समजते आहे 

Post a Comment

0 Comments