Header Ads Widget

जळगावचे जिल्हाधिकारी राऊत यांची नांदेडला बदली अखेर अडीच ते तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकारी मिळाला !!

      माधव पवार 
राज्याच्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेड येथे बदली करण्यात आली असून यापूर्वी आर्दड यांच्या नावाची चर्चा करण्यात येत होती परंतु नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कोण ? असा अनेकाला प्रश्न पडला होता तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची नागपूर येथे बदल्याच्या नंतर जिल्हाधिकाऱ्याना नांदेड जिल्हा वाऱ्यावर आडीच महिन्या नंतरचा का मिळेना परंतु जिल्हाधिकारी नांदेडला मिळाला आहे

तत्कालीन जिल्हाधिकारी विपीन इटनकर त्यांची बदली
 नागपूरला झाली आणि नांदेडचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित केले त्यात जळगावचे नेते तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नांदेडचे पालकमंत्री नेमणूक केली महाजन पालकमंत्री होताच ?  नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली नांदेडला करण्यात आली असून सदरचे नूतन जिल्हाधिकारी विध्यार्थीच्या शिक्षणा बरोबर शेतकऱ्यांकडे लक्ष देतील अशी अपेक्षा जनतेनी व्यक्त केली आहे






Post a Comment

0 Comments