माधव पवार
धर्माबाद तालुक्यातील मौजे चिकना येथील रहिवासी असलेली व जिजामाता कन्या शाळेत इयत्ता नवव्या ब मध्ये दर्जेदार शिकणारी येथील वर्षीय विद्यार्थीनी स्वाती कामाजी आवरे ही शाळा सुटल्या नंतर चिकना या गावाकडे जाण्यासाठी धर्माबाद येथील महाराष्ट्र बस स्टॅन्ड कडे जात होती असे सांगण्यात येत असून दिनांक २९ सप्टेंबर २०२२ सायंकाळी अंदाजे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान सदरील मुलीच्या अंगावर वीज पडल्यामुळे ती जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहें
तालुक्यातील चिकना येथील सदर विद्यार्थिनीला धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वेणुगोपाल पंडित यांनी सदर मुलगी मृत्यू पावल्याची माहिती दिली.स्वाती आवरे हिच्या मागे दोन मैत्रिणी ही बस कडे जात होते परंतु त्या थोडे पाठीमागे असल्यामुळे थोडक्यात बचावले आहेत. सदर घटनेमुळे चिकना गावावर शोककळा पसरली आहे.

0 Comments