हिमायतनगर नागोराव शिंदे -
हिमायतनगर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत पळसपुर डोल्हारी सिरपली मार्गाचे कामाला मंजुरी मिळाल्यानंतर १३ मार्च२०२२ रोजी हिंगोलीचे खा.हेमंत पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ पळसपुर येथे पार पडला होता या कामासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन मिळून ८ कोटी २ लक्ष (लाख ) रुपयेचा निधी उपलब्ध झाल्याने कामास गती मिळाली आहे
या कामावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता नांदेड सुधीर पाटील यांच्या देखरेखीखाली काम सुरू असून काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येते आहे हे काम चार ते पाच दिवसात डोल्हारी पर्यंत होणार असल्याचे सांगण्यात आले हे काम झाल्यावर वहातुकीला तात्पुरता दिलासा मिळत असला तरी काम लवकर व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे
खा.हेमंत पाटील यांच्या सहकार्याने १२.२००कि.मी रस्त्याच्या कामाचा प्रश्न प्रलंबित होता त्यांचे पाठपुराव्यामुळे पळसपुर डोल्हारी सिरपली मार्गाचा प्रश्न सुटला हा मार्ग विदर्भ मराठवाड्याला जोडणारा इ जी क्रमांक १४ गांजेगाव मार्ग ढाणकी ला जोडला जात असल्याने ढाणकी बिटरगाव उमरखेड माहुर जाण्यासाठी व ढाणकी हिमायतनगर वाशी मार्गाने म्हैसा निर्मल बासर आंध्र प्रदेशला ला जोडला जात असल्याने प्रवाशांच्या सोयीचा होणार आहे
ह्या रस्त्याचे काम औरंगाबाद येथील सिद्दीकी यांनी घेतले असून काम युद्धपातळीवर सुरू असून कामाच्या होत असलेल्या दृष्टिकोनातून या रस्त्यावरून लवकरच महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे

0 Comments