Header Ads Widget

नूतन जिल्हाधिकाऱ्याच्या प्रतिक्षेत आखा जिल्हा लोकप्रतिनिधीच्या बेजबाबदार पणामुळे नांदेडला बॉस मिळेना ? -

    
       माधव पवार 
भाजपासह शिंदे गटाचा राजकीय वर्दळीत राज्यातील एका नामांकित जिल्ह्यासाठी एक जबाबदार अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक होत नसल्यामुळे अख्खा नांदेड जिल्हा नूतन जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे चर्चा ग्रामीण भागात होताना दिसत असून या जिल्ह्यातील राजकीय पुढारी आमदार व खासदार याने जिल्हाधिकाऱ्यांची मागणी करत नसल्याचे ही जनतेतून बोलल्या जात असले तरी जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर यांची बदली झाल्याच्या नंतर सदरच्या जिल्ह्यासाठी कायम स्वरूपी बॉस मिळत नसल्याची चर्चा मात्र जागोजागी होताना ऐकावयास मिळत आहे

नांदेड जिल्ह्यासाठी नुतन जिल्हाधिकारी मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे कामे खोळंबली व शासकीय कामे पांदण रस्ते असो की रोजगार हमी योजनेचे काम या असो सर्वच कामे खोळंबली असल्यामुळे प्रशासनाने व राज्याच्या राज्याच्या राजकारणातील राजकीय नेते मंडळी व जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी नुतन जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावेत असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात असले तरी जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा बॉस असल्यामुळे सदरच्या अधिकाऱ्यांची जिल्ह्यातील जनतेला त्यांची गरज आहे आहे 

Post a Comment

0 Comments