माधव पवार
भोकर तालुक्यातील मौजे पिपळढव येथील रहिवासी असलेले शेतकरी कुटुंब हे नेहमीच्या प्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले असताना दिवस भर उन्हाचा कडाका पडल्याच्या नंतर आकाशात अचानक बिघाड होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला असल्याने शेतात असणाऱ्या व काम करणाऱ्या शेतकरी जोडप्यावर वीज पडली असल्यामुळे पत्नी जाग्यार ठार झाल्याची घटना घडली तर सदरच्या घडलेल्या नैसर्गिक आपत्तीत पती ही या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असल्यामुळे भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात सदरच्या शेतकऱ्यावर डॉक्टरा कडून उपचार चालू करण्यात आल्याची माहिती आहे
पिपळढव गावातील रहिवासी कुटूंबावर नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने पकडलेल्या वीज दुर्घटनेत सदरचे शेतकरी सुभाषराव पोले व या अंदाजे ४० ते ४२ असून त्यांच्या ललिता सुभाषराव पोले त्या जागीच ठार झाल्याची घटना पिपळढव येथे घडली असल्यामुळे या दुर्घटनेत शेतकरी सुभाष राव पोले हे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे
सदरची घटना ही दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी आडीच तीन वाजण्याच्या दरम्यान सदरील कुटुंब एका झाडाखाली बसले होते असे सांगण्यात येते सदरील घटनेची माहिती कळताच भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे
सदरच्या घटने बाबत भोकर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्याशी रात्री उशिरा दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता काही तांत्रिक अडचणीमुळे फोन उचलू शकले नसल्यामुळे त्या घटनेची अधिक माहिती नायगाव फास्ट न्यूजला प्राप्त झाली नसल्यामुळे ही सदरची घटना किती वाजता घडली व सदरचे कुटुंब झाडाखाली होते का ? शेतातील झोपड्यात पाऊस पडत असल्यामुळे बसले होते यांची माहिती मिळाली नाही परंतु सदरची घटना ही अतिशय दुर्दैवी असल्याने घडलली असल्यामुळे सदरच्या घटने बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे

0 Comments