हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या व शहरातील लकडोबा चौक येथील रहिवासी असलेला तरुण बांड युवक यांची वाशीच्या माळात चौघा जणांनी सांगणंमत करून दगडा सह्याने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी घडली असल्यामुळे एकच खळबळ उडाली असून सदरच्या खून प्रकरणातील एका महिला आरोपीसह तीन पुरुष आरोपी हिमायतनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बी डी भूसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली कलम ३०२ दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे
शहरातील लकडोबा चौक येथील रहिवासी असलेल्या तरुण पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड
या तरुण बांड युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असल्यामुळे या घटनेतील आरोपी लक्ष्मण अकलवाड, परमेश्वर अकलवाड, रामेश्वर अकलवाड, यांच्यासह एक महिला आरोपी लक्ष्मीबाई अकलवाड यांना हिमायनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भूसनूर यांनी अटक केली असल्याचे समजते
तालुक्यातील वाशी जवळच्या माळात सदरच्या तरुणांनाचा निर्घृण दगडाने खून करण्यात आला परंतु ते कशामुळे करण्यात आला यांची मात्र माहिती रात्री उशिरा पर्याय मिळू शकली नसली तरी दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजी सर्व सत्य घटनेचे सविस्तर घटनाक्रम स्पष्ट होणार असल्याचे चिन्ह असल्यामुळे सदरची घटना ही अतिशय दुर्दैवी मानली जातं असून हिमायतनगर सारख्या शांत शहरातील लकडोबा चौक येथे रहाणाऱ्या तरुणांची हत्या करण्यात आली असल्यामुळे पोलिसांनी चार आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे

0 Comments