Header Ads Widget

बळेगाव बंधाऱ्याच्या बॅक वॉटरच्या पाण्यात बरबडा येथे हनुमान मंदिराच्या जवळ असलेल्या जुन्या पुलावरून ट्रॅक्टर ओढ्यात कोसळले हेड गायब मात्र जीवितहानी नाही

बरबडा :- किरण हणमंते -

नायगाव तालुक्यातील मौजे बरबडायेथील हनुमान 
मंदिरा जवळील एका मोठया ओढ्याला बळेगाव बंधाऱ्याच्या बॅक वॉटरच्या पाण्यामुळे मोठा डॅम तयार झाला असून यातून जाण्यासाठी बरबडा ते वजीरगाव या मार्गावर एक जुन्ने पूल असून यावरून ट्रॅक्टर चालकानी घेऊन जात असताना अचानक ओढ्याच्या खोल पाण्यात कोसळून पाण्यात हेड गायब झाल्याचे व्रत असून रस्त्या लगत काही महिन्यापुर्वी डांबरीकरण करण्यात आले होते सदरील ओढ्यावर एका गुत्तेदाराने पूल अर्धवट बांधून ठेवले आहे

अध्याप पूर्ण झाले नसल्यामुळे अगोदरच्या पुला वरून जात असताना हा अपघात घडला असला तरी काही दुर्दैवी घटना घडली नसल्याचे व्रत आहे 

सततच्या पावसाने त्या पुला जवळील रस्ता पूर्णपणे उखडून पडल्यामुळे वाहन धारकांना जाताना खुप काळजीने जावे लागते. स्थानिक च्या वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास एक ट्रॅक्टर त्या पुलावरून जात असताना रोडवर खड्डा असल्यामुळे त्याचा अंदाज ट्रॅक्टर ड्राइवर ला लागला नसल्याने ते सरळ पुलावरून खाली कोसळला यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे पत्यक्ष दर्शीनी यांनी सांगितले आहे.

या घटनेमुळे वाहन धारकांत व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हि घटना गावभर पसरल्याने एकच बघ्याची गर्दी जमली. या घटनेमुळे सर्व गावाकऱ्यातून लवकरात लवकर पुलाचे काम पुर्ण करून रहदारी चा मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments