माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोदजी शेवाळे यांनी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून गेल्या दोन ते तीन दिवसा खाली जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोऱ्या होत असल्याच्या संदर्भात व छोटे छोटे लेकरं घेऊन जाणारी टोळी सक्रिय झाली असल्याची अफवा होत असल्याच्या संदर्भात ऑनलाईन बातमी प्रकाशित करण्यात आली होती त्या बातमीची दखल पोलीस अधीक्षकानी घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या ठाणे प्रमुखाला आदेश दिल्यामुळे नायगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी पोलीस गाडीच्या माध्यमातून जनतेला महत्वाचे आवाहन केले आहे
चोऱ्या करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असलेल्याच्या अफवा कोणत्या ही व्यक्तीने करू नये व काही कोणा बद्दल संशय आल्यास पोलीस ठाण्याशी व ११२ वर संपर्क साधावा असे पोनि अभिषेक शिंदे यांनी आवाहन आहे
"नायगाव फास्ट न्यूजची पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी घेतली दाखल " जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सर्व पोलीस ठाण्याला आदेश दिल्यानुसार ठाणे प्रमुखांनी आदेशाचे पालन करून जनतेला महत्वपूर्ण पोलीस गाडीच्या माध्यमातून अलॉन्समेंट करीत जनतेनी व नागरिकांनी कसल्याच प्रकारचे अफवा करू नये असे आवाहन नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून रस्त्या रस्त्यानी सूचना करीत असल्याचे दिसून येत आहेत दिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजी नायगावचा बाजार व मोठया प्रमाणात व्यापारी बाजार करण्यासाठी आला असताना सुद्धा ग्रामीण भागात जनता हायस्कुलचे मुली धरून नेले असल्याच्या अफवाला खेड्यापाड्यात केल्यामुळे मोठा उत्त आला होता

0 Comments