Header Ads Widget

भोपळचा तीस वर्षीय तरुण केरूळ जवळ ट्रॅव्हल्सच्या धडकेत जागीच ठार रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

      गोविंद नरसीकर
नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेला तीस वर्षीय तरुण हा लक्ष्मीचा सण असल्यामुळे आपल्या पत्नीसह मुलांना घेऊन सगरोळी येथे पत्नी व मुलास सोडून घराकडे मोटार सायकल वर  वापस येत असताना केरळ कॉर्नर जवळ ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकलचा समोरासमोर झालेल्या धडकेत भोपळ्याचा तीस वर्षीय तरुण मयत पंडित मनोहर बावणे हा जागीच ठार झाली असल्याची घटना दिनांक २ सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करूळ कॉर्नर जवळ हा सदरचा अपघात ट्रॅव्हल्स आणि मोटार सायकल झाला असल्यामुळे लक्झरी मधील काही प्रवाशी रामतीर्थ पोलिसांना घटनेची माहिती देतात पोलीस घटनास्थळी रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदरची घटना घडली असल्यामुळे सर्वत्र वाऱ्यासारखे चर्चा पसरली असून सदरचा अपघात हा नरसी ते देगलूर मार्गावर झाला असल्याचे सांगण्यात आले असून रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सदरील घटनेचा पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतल्याचे समजते सदरच्या अपघातातील ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच १२ एच बी ओ ८५३ आणि मोटार सायकल क्रमांक एम एच २० सी के १२७८ यांचा समोरासमोर धडक लागल्यामुळे भोपळा येथील तीस वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे 

Post a Comment

0 Comments