माधव पवार
नायगाव तालुक्यातील मोजे कोलंबी येथील रहिवासी असलेले तथा सामाजिक कार्यकर्ता तसेच दलित महासंघाचे जिल्हाध्याक्ष तथा नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचीचे माजी संचालक आणि कोलंबी गावचा पाच वर्ष अतिशय सुंदर कारभार सरपंच एक गावची जबादारी असते या डोळस विचारातुन गावासाठी काही तरी केले पाहिजे आणि करून दाखविले असे माजी सरपंच उत्तम गवाले यांना मुबंई येथे नुकताच समाज भूषण पुरस्कार मिळाला असल्यामुळे त्यांना विशेष मान्यवरांच्या उपस्थित सन्मानीत करण्यात आले असल्याची माहिती यांनी दिली आहे
तालुक्यातील मौजे कोलंबी येथील भूमीपुत्र तथा माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ता उत्तम गवाले यांना सत्य शोधक आण्णाभाऊसाठे यांच्या १०२ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने स्नेहबंदन सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान अंबरनाथ मुबंई येथे आ. डॉ बालाजीराव किनीकर, पानीपतकार लेखक विश्वास पाटील, डॉ अरुण देशपांडे, सदरील प्रतिष्ठानचे राजेश कांबळे व इतर विशेष मान्यवरांच्या उपस्थित गवाले यांचा सन्मान करण्यात आला मुखेड तालुक्यातील कामजळगा येथील रहिवासी असलेले तथा हल्ली मुक्काम दाबका गुंडोपंत येथील हांनमतराव निवृत्ती गवाले बंधूनी ही शुभेच्छा दिल्या आहेत
कोलंबी येथील माजी सरपंच उत्तम गवाले हे चांगल्या नेतृत्वाचे व्यक्तिमत्व असलेले हे सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असून असल्यामुळे अशा नेतृत्वाला समाज भूषण पुरस्कार देण्यात आला असल्यामुळे त्यांचा राजकीय क्षेत्रासह विविध संघटनेच्या माध्यमातून कोलंबीचे माजी सरपंच उत्तम गवाले यांचे अभिनंदन करण्यात येत असून सदर पुरस्कार हा त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वामुळे मिळाला असल्याचे त्यांचे सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदन आणि त्यांच्या चाहात्यातुन शुभेच्छा देण्यात येत आहेत

0 Comments