हिमायतनगर : नागोराव शिंदे -
शिवसेना विद्यार्थी सेनेच्या ढाणकी शहर प्रमुख पदी आकाश नागोराव शिंदे पळसपुरकर यांची निवड नुकतीच निवड करण्यात आली असून शिवरायाचे विचार घरा घरा पोहचविण्यासाठी आकाश शिंदे यांची विद्यार्थी सेनेचे उमरखेड तालुका प्रमुख नितीन शिंदे यांनी नुकतीच निवड करून निवडीचे पत्र जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
शौर्य व धैर्याची मूर्ती, भारताचे शूर पुत्र छत्रपती शिवाजी महाराज एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक होते. एकीकडे ते खूप सामर्थ्यवान होते, तर दुसरीकडे, ते दयाळूपणासाठी देखील ओळखले जात होते त्याच पद्धतीने शिवसेना विद्यार्थी सेनेच्या ढाणकी शहर प्रमुख पदी आकाश शिंदे यांची निवड करण्यात आल्यामुळे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे
महाराष्ट्राच्या रयतेच्या मनात त्यांनी अधिराज्य गाजवले अश्या शिवछत्रपती शिवरायांना कधी ही विसरता येणार नसल्यामुळे शिवरायाचे विचार व त्यांच्या शौर्याच्या गाथा येणाऱ्या प्रत्येक पिढीला मोठ्या अभिमानाने सांगण्यासाठी यावेत म्हणून सदरच्या शिंदे यांच्या निवडी बद्दल प्रफूल गोरडकर,बंटी जाधव,संभाजी गोरडकर प्रशांत जोशी
संजय कुंभरवाड विशाल नरवाडे संदीप ठाकरे अविनाश कदम यांनी प्रसंसा केले आहे
जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा तो माझा शिवबा होता अशा शिवसेना विद्यार्थी सेनेच्या ढाणकी शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली असल्यामुळे राजकीय क्षेत्रा बरोबर व विविध संघटनेच्या माध्यमातून आकाश भरारी घेण्यासाठी आकाश शिंदे यांना शुभेच्छा दिल्या जात आहे

0 Comments