नायगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कुंटूर या बँकेचे कामकाज समाधानकारक झाले असल्यामुळे व उत्कृष्ट काम करणाऱ्या कुंटूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा अधिकारी बी जे वानोळे यांनी या विभागात म्हणजे नायगाव, धर्माबाद, उमरी, बिलोली, देगलूर येथील बँकेत प्रथम क्रमांक कामकाजात असल्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्यासह कार्यकारी संचालक डॉ अजय कदम यांच्या हस्ते दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी विशेष शाल व श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला आहे
कुंटूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा अधिकारी बी.जे वानोळे यांच्या माध्यमातून व कर्मचाऱ्यांकडून सदरचे काम सुरळीत होत असल्यामुळे सदरील बँक शाखा अधिकाऱ्यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षासह कार्यकारी संचालक डॉ कदम सत्कार केले आहेत आणि विविध क्षेत्रातील मंडळी शाखा अधिकाऱ्याचा सन्मान करीत असून बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी एम आर हंगरगे यांची बदली झाल्याच्या नंतर या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा अधिकारी म्हणून वानोळे यांनी पदभार घेतला आहे
तालुक्यातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कुंटूर या शाखेतून शाखाअधिकारी बी जे वानोळे दिनांक १ ऑगस्ट २०२२ पासून यांनी कर्ज वाटप १ कोठी ५३ लाख १५ हाजार २१० रुपये वाटप केले एकूण सभासद ३३६ अनुदानाच्या स्वरूपात ७ कोठी ३१ लाख ७३ हजार रुपये खातेदार ९ हाजर ६७८ यांना वाटप करण्यात आले तर वसुली २६० शेतकऱ्या कडून १ कोठी २७ लाख ८८ हजार ४३४ रुपये वसुल करण्यात आले त्याच बरोबर पी एम किसान पैसे वाटप, आधार लिंक करणे,३२९० शेतकऱ्यांना ए टी एम वाटप करणे बँकेचा आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवणे आदी बाबीचा विचार व बँकेतील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन व्यवस्थित कामे करणे आदी कामे शाखा अधिकारी वानोळे यांनी करून घेतल्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त केल्या जात आहे

0 Comments