माधव पवार
महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनाची माहिती व शासकीय अनुदान वाटप करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याची एकमेव असलेली कामधेनू म्हणून ओळखली जाणारी बँक म्हणजे नांदेड जिल्हा सहकारी बँक होय गेल्या काही वर्षापासून ही बँक केवळ आणि केवळ शासकीय आनुदानावरच संसार थाटली आणि शेतकऱ्यांच्या विश्वासावर आज ही जिल्हासह कुंटूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तत्कालीन शाखा अधिकारी एम आर हांगरगे, शाखा अधिकारी वानोळे सारख्या अधिकाऱ्यानी सदरच्या बँका जिवंत ठेवल्या आहेत
सदरील बँकाचा कारभार सुरळीत चालत असल्यामुळे याच बँकेतुनचं शासनाचे शासकीय आनुदान वाटप करण्यासाठी सदरील बँकेचे शाखा अधिकारी व बँक कर्मचारी शेतकऱ्यांना आलेला विमा असो अनुदान असो तात्काळ वाटप करण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु जिल्ह्यात मोठया नवाजलेल्या बँका म्हणजे नॅशनल बँका या बँकेच्या शाखाधिकाऱ्यासह दलालाच्या संगनमताने बँकेचा आर्थिक व्यवहार चालतो ? जिल्हा मध्यवर्ती बँकेत एक तरी दलाल दाखवा असे सदरील जनतेतून बोलल्या जातं आहे
नॅशनल बँकेचा आर्थिक व्यवहार म्हणजे शाखा अधिकाऱ्यासह दलालाची चांदी कारण शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करण्यासाठी दलालाच्या मार्फत कर्ज मंजूर केल्या जात जाते आज पर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले नाही दलाला फाईली दाखल केल्या त्यांना कर्ज मिळाले अनेक शेतकऱ्यांच्या कर्जाच्या फाईली बँकेत धुळखात आहेत यांचा विचार कोण व कधी होणार ? असा शेतकऱ्यांनी प्रश्न केला आहे
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा अधिकाऱ्यानी कर्ज वाटपात व विविध शासनाच्या योजनेच्या निधी वाटपात सरकारी बँकांची मनमानी असून बँकेत आलेल्या प्रत्येक ग्राहकांना वेगवेगळ्या आडचणी असतात विद्यार्थ्यां पासून ते वयोवृद्ध लोकां पर्यंत नँशनल बँकेत गर्दी होताना दिसत असल्यामुळे ग्राहकाची समस्या ऐकूण घेण्यासाठी एकाचा ताळमेळ एका लागत नाही असे दिसून येत आहे
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक पूर्णत आर्थिक व्यवहारामुळे अडचणीत आली होती परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुधारणा करण्यासाठी सदरील बँकेच्या यंत्रनेने बँक भविष्यात विकसित करण्यासाठी पुढाकार घेऊन सुरळीत केली आणि बँकेचा आर्थिक व्यवहार व शासकीय अनुदान असो विमा असो ठेवीदार असो कर्ज वाटप असो यांना तात्काळ मिळवून देण्यासाठी सदरच्या बँक शाखाधिकाऱ्यानी पुढाकार घेत असताना दिसत आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेत २००५ पर्यंत संचालक मंडळ अस्तित्वात होते
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक भविष्यात सुरळीत करण्यासाठी राजकीय मंडळी पुढाकार घेतला पाहिजे आणि ती जवाबदारी राजकीय पुढाऱ्याची असू शकते शासकीय अनुदान नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतुनच घेणार असा विश्वास शेतकऱ्यांनी दाखविले तरच सदरची बँक व बँकेतील कर्मचारी समाधान कारक काम करतील अन्यथा शेतकऱ्यांना नॅशनल बँकेच्या शाखाधिकाऱ्यासह दलालाच्या मार्फत कामे करून घ्यावे लागतील ग्रामीण भागातील सहकारी साखर कारखाने
जसे कायमचे बंद झाले तसेच यात ही राजकारण येऊन कायमची बँक बंद होऊ नये म्हणून बँकेतुनच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शासकीय आनुदान शेतकऱ्यांनी घ्यावेत असे सुनील रामदासी यांचे मत असले तरी शेतकऱ्यांनी बँकेकडे मागणी करावी जिल्हा मध्यवर्ती बँका शेतकऱ्यांसाठी चोवीस तास सज्ज आहेत

0 Comments