नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -
नायगाव तालुक्यात सर्वात महत्वाची असलेली जिल्हा परिषद हायस्कुलच्या शिक्षण समिती अध्यक्ष पदी चंद्रकांत सोपान पाटील शिंदे तर उपाध्यक्ष पदी जनाबाई लंगडापुरे यांची खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे मांजरम येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड पालकांच्या उपस्थित नुकतीच पार पडली
येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत सरपंच शोभाबाई निळकंठराव मांजरमकर , उपसरपंच मथुराबाई दिगांबरराव शिंदे, पोलिस पाटील जयराज पाटील शिंदे,माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संगीता संतोष केते, केंद्र प्रमुख आर, एम.चिकलवाड, मुख्याध्यापक भुजंग सोनकांबळे , निवडणूक अधिकारी व्ही. एल . अंगलोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया आरक्षण पध्दतीने पालकांच्या उपस्थित पार पडली.
बिनविरोध निवडीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी चंद्रकांत सोपान शिंदे , उपाध्यक्षपदी जनाबाई सुरेश लंगडापुरे, तर सदस्य पदी विश्वाभंर देवराव माली पाटील, भास्कर दत्तात्रय शिंदे, दत्ता भिमराव नव्हारे, रेश्मा इरफान शेख,मिनाबाई राजू फुगारे यांची बिनविरोध निवड पार पडली.या निवडीचे स्वागत पालक शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केले आहे.

0 Comments