Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील मौजे पाटोदा सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध !!

बरबडा :-प्रतिनिधी किरण हनमंते 

नायगाव तालुक्यातील पाटोदा येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून दत्तकृपा शेतकरी विकास पॅनल ने एक हाती विजय मिळवला आहे जिल्ह्यात सर्वत्र सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीची धामधूम दिसून येत आहे. एकूण तेरा सदस्य असलेल्या पाटोदा सेवा सहकारी सोसायटीसाठी २५ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. दि २ सप्टेंबर रोजी नामांकन मागे घ्यावयाची शेवटची तारीख होती. तो पर्यंत १२ उमेदवारांनी स्वतःचे नामांकन वापस घेतले. त्यामुळे दत्तकृपा शेतकरी विकास पॅनलचे सर्व तेरा उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

विजयी उमेदवारांमध्ये बालाजी शिंदे,  शिवाजी तिजारे, शिवाजी कोल्हेकर, सुधाकर  शिंदे, बळीराम आलेवाड, मारोती गोडगेवाड, दिलीप हंबर्डे , शिवराम शेंडगे, बालाजी  पुपलवाड, विलास  शिंदे, गयाबाई हंबर्डे , कांताबाई ढवळे, रेणुकाबाई शिंदे यांचा ससमावेश आहे.
दत्तकृपा शेतकरी विकास पॅनल प्रमुख साहेबराव शिंदे, संदीप पाटील शिंदे, केशवराव आलेवाड, सरपंच प्रतिनिधी  हरीषचंद्र म शिंदे, नागन शेंडगे, भाजपा विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष गुरूनाथ शिंदे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन  केले.

यावेळी जेष्ठ नागरिक विश्वांबर हंबर्डे , भगवान तिजारे, मधुकर शिंदे, बालाजी शिंदे, रंगराव शिंदे, संभाजी पुप्पलवाड, संतराम दासरवाड, चंद्रकांत ढवळे, व्यंकटी कोकुलवार, बाबाराव पुप्पलवाड, अनिल ढवळे, देविदास वाघमारे, काशिराम शिंदे, आनंदा कोत्तापल्ले   यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments