कुष्णुर ता नायगाव येथील पशुधन आधिकारी जलदेवार यांनी आंमृत म्होस्तवा निमित्त झेंडावंदन करताना पहिल्या दिवशी चढवलेला झेंडा रात्रभर तसाच ठेऊन, केलेली घोड चूक वरिष्ठांच्या लक्षात येऊन सुद्धा त्यावर पांघरण टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याने जलदेवार केवळ चौकशीच्या फार्सला सामोरे जाऊन या गँभिर प्रकरणात सध्या तरी मोकळेच सूटले आहेत.वरिष्टानी याविषयी कार्यवाही नाही केल्यास जलदेवार मोकाट राहिल्यास भविष्यात त्यांचा परिणाम होऊन वरिष्टाना ही हे प्रकरण शेकणार आहे.
द.१३ ते १५ आगस्ट रोजी तीन दिवस आंमृत मोहस्तवा निमित्त सरकारी कार्यालयात झेंडा वंदन करण्याचे आदेश सर्वत्र दिले होते.परंतु कुष्णुर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात १३ ऑगस्ट रोजी सकाळी केलेला झेंडा वंदन झाले खरे पण येथील जवाबदार जलदेवार नावाचे पशु वैद्यकिय अधिकारी यांनी गावातील खाजगी व्यक्तीस झेंडा वंदन उतरविण्यास सांगून निघून गेले. तो झेंडा न उतरवता तसाच ठेवण्यात आला
या विषयी माहिती कळताच वरिष्टानी मांजरम येथील पशुधन विकास अधिकारी डाँ.खिलारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काही कर्मचारी यांची नियुक्ती करून १४आगस्ट रोजी झेंडावंदन करण्यासाठी पाठवले त्यांनी कुष्णुर येथे जाऊन झेंडा वंदन करून सायंकाळी झेंडा उतरवून ग्रामस्थांमध्ये झालेला संभ्रम दूर केला खरा पण कार्यवाही न झाल्याने विषय चर्चेचा बनला आहे
याविषयी खिलारे यांना विचारलं असता त्यांनी या प्रकरणास दुजोरा दिला असून हा गँभिर प्रकार लक्षात घेऊन पोलीस ठाणे कुंटुर येथे तक्रार नोंदवण्या साठी गेलो असता ग्रामस्थांतून तक्रार येउद्या नंतरच गुन्हा दाखल करू असे सांगून तक्रार घेण्यास कुंटुर पोलिसांनी टाळा टाळ केली असे सांगितले तर जलदेवार यांना विचारले असता आपल्याला कोरोना झाला होता प्रकृती बिघडल्याने आलो नाही असे सांगितले.यामुळे आंमृत महोस्तवि वर्षात झेंडा वंदन प्रकरणात वरिष्ट निष्काळजी करणाऱ्या जलदेवार यांच्या वर कार्यवाहीची मागणी जोर धरत आहे.

0 Comments