Header Ads Widget

लिं.माधवराव पाटील पांडागळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्य शिराढोण येथे मोफत महाआरोग्य शिबिर गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन

शिराढोण : शिवकांत डांगे - 

लोकाभिमुख कार्य आणि समाजजाणिवा असणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व लिं. माधवराव गोविंदराव पाटील पांडागळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्य शिराढोण येथे ता.१६ सप्टेंबर रोजी मोफत महाआरोग्य शिबिर व  महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन कंधार काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव माधवराव पाटील पांडागळे यांनी केले आहे.
 कंधार तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते पंचायत समितीचे मा.सभापती लिं. माधवराव गोविंदराव पाटील पांडागळे यांचे देहावसान होऊन एक वर्ष उलटला.त्यांना अभिप्रेत असणारा सेवाभाव आणि लोकसेवेचा वसा अविरत राहावा व त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्य परिसरातील गरजू नागरिकांना महाआरोग्य सेवेचा लाभ घ्यावेत असे आवाहन संयोजकाने केले आहे 


यासाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी नांदेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर व वैद्यकीय यंत्रणांकडून मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने बालरोग,दंत रोग,त्वचा रोग,हाडांचे आजार,पोटाचे विकार व निदान तसेच नेत्ररोग तपासणी,मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया इत्यादी बाबी मोफत होणार आहे
 रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.शिबिराचा लाभ घेण्यासाठी ता.१४ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत गरजू रुग्णांनी स्वतःची नावनोंदणी करून ता.१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ०२ वाजेपर्यंत भीमाशंकर माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात उपस्थित राहणे गरजेचे आहे.रोगनिदान व उपचारासाठी नांदेड येथील विविध आजारांशी संबंधित डॉक्टर उपस्थित राहणार आहेत

नेत्ररोग तज्ञ डॉ.शाम तेलंग,हृदयरोग तज्ञ डॉ.श्रीनिवास संगनोर,स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुनीता बुरांडे,बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रकाश गुरुतवाड,बालरोग तज्ञ डॉ.संतोष बोमनाळे,मूत्ररोग तज्ञ डॉ.प्रमोद हंबर्डे, पोटविकार तज्ञ डॉ.संदीप चाबुकस्वार,अस्थीरोग तज्ञ डॉ.अवधूत मोरे,बालरोगतज्ज्ञ डॉ.नागेश पांडागळे,पोटविकार तज्ञ डॉ.मनोज हंबर्डे,डॉ.चंदू पाटील,कुणाल सिसोदिया यांच्यासह इतर तज्ञ व सुसज्ज आरोग्य यंत्रणा उपस्थित राहणार आहेत.या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन कंधार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे यांनी नागरिकांना केले आहे.

Post a Comment

0 Comments