Header Ads Widget

बरबडा येथे एम.के.सी.एल. तर्फे रोशनी कंप्युटर एज्युकेशन ने डिजिटल इंडिया, महा आयटी जिनियस उपक्रम साजरा

 बरबडा :-किरण हनमंते - 

बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक बरबडा आणि राजीव गांधी माध्यमिक विद्यालय वजीरगाव या ठिकाणी घेण्यात आला आहे.
सकाळी बरबडा येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेत कार्यक्रम घेण्यात आला आहे

या कार्यक्रमानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधुन एम.के. सी.एल. पुणे च्या मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाला जिल्ह्याचे समन्वयक पंढरीनाथ आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या मार्गदर्शनानुसार बरबडा येथील शासनमान्यता प्राप्त अधिकृत केंद्र रोशनी कंप्युटर एज्युकेशन या संस्थेचे संचालक किरण हनमंते यांनी हा उपक्रम घेतला आहे.
   
या निमित्त या शाळेत या संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी यांचा सत्कार शाल व पुष्पहार घालुन तसेच दुपारी राजीव गांधी  माध्यमिक विद्यालय वजीरगांव येथील मुख्याध्यापक सूर्यवंशी या दोन्हीही मुख्याध्यापक रोशनी कंप्युटर चे संचालक किरण हनमंते व एम.के.सी.एल. चे  एम. आय. अखिल सय्यद यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते

एम.के.सी.एल. तर्फे आलेले एम. आय. अखिल सय्यद यांनी विध्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी महा आय.टी. जीनियस, एम.एस.सी.आय.टी.,  डिजिटल इंडिया, क्लिक डिप्लोमा क्लिक इंग्लिश  या सर्व कोर्सेस व स्पर्धा परीक्षा बद्दल जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथे माहिती देण्यात आली.

दुपारी राजीव गांधी माध्यमिक विद्यालय वजीरगाव या ठिकाणी एम. के. सी. एल. चे एम. आय. अखिल सय्यद व रोशनी कंप्युटर चे संचालक किरण हनमंते दोघांनीही    महा आय.टी. जीनियस, एम.एस.सी.आय.टी. डिजिटल इंडिया, क्लिक डिप्लोमा क्लिक इंग्लिश  या सर्व कोर्सेस व स्पर्धा परीक्षा या सर्वा बद्दल माहिती देण्यात आली.

Post a Comment

0 Comments