बरबडा :- प्रतिनिधी : किरण हनमंते -
बरबडा येथे हा सोहळा पार पाडण्यात आला.हा सोहळा अमृत महोत्सवा निमित्त स्वातंत्र्य दिनाचे औचित साधुन मराठा समाज व वर्गमित्र यांनी आयोजित केला. पंच्याहत्तर व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या गावातील सैनिकांचा सत्कार करणे हे अभिमानास्पद बाब आहे. सैनिक कोंडराव देशमुख यांची कहाळा येथून भव्य रॅली काढण्यात आली. जवळपास सात किमी अंतराहुन निघुन बरबडा गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली.
एकातीस ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.आज सकाळी कहाळा येथे दहा वाजता आगमन होताच भव्य रॅली तेथुन बरबडा नगरीत आली. त्यांचे आगमन होताच फटाके वाजवून मिरवणूक काढण्यात आली. यात डीजे च्या तालावर देशभक्ती गीत वाजवत स्काउट गाईड चे विद्यार्थी होते. यामध्ये कोंडराव देशमुख, बालाजी सुर्यतळ, नागोराव ढवळे, माधव मदेवाड हे सेवानिवृत्त सैनिक आहेत त्यांच्या बरोबर आजी सैनिक मुकिंद ढवळे आणि पंचायत समिती नायगाव चे सेवानिवृत्त कर्मचारी साहेबराव शिंदे यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला आहे.यावेळी अनेक ठीक ठिकाणी सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय बरबडा येथे सरपंच माधव कोलगाणे तर बसस्टॉप येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने साहेब गुंटे व कंधारे यावेळी समाजाच्या वतीने शाल व पुष्पहार घालुन देशाच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांचा सेवानिवृत्त झाल्याने सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याचे अध्यक्ष जवाहरलाल शिक्षण समितीचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलिपराव धर्माधिकारी, तर प्रमुख पाहुणे म्हणुन बरबडा नगरीचे सरपंच माधव कोलगाणे, माजी सरपंच बालाजी मदेवाड, शिवाजीराव धर्माधिकारी, माजी उपसरपंच भास्करराव धर्माधिकारी, प्रकाशराव धर्माधिकारी, गुणाजी पा. शिंदे, श्रीधर चिकाळेकर, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे, बरबडा केंद्राचे केंद्रप्रमुख माधव रेडेवाड, चिकाळ्याचे सरपंच देशमुख साहेब, मुख्याध्यापक साहेब गुंटे व कंधारे ईलीयास बेग, बालाजी जंगीलवाड, चंदर अनंतवार, देविदास लंगोटे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन एन. टी. तिप्पलवाड यांनी तर आभार देशमुख यांनी केले.

0 Comments