Header Ads Widget

काहाळा येथील माजी सरपंच प्रतिनिधी सुनील लुंगारे यांनी आपल्या सौ भाग्यवतीच्या वाढदिवसाला गुलाबाच्या फुलाचे झाड भेट देऊन केला वाढदिवस साजरा एक कौतुकास्पद संदेश

 माधव पवार / रामराव पाटील ढगे - 
नायगाव तालुक्यातील कहाळा बुद्रुक येथील माजी सरपंच प्रतिभा पाटील लुंगारे यांचे पती समाज रत्न पुरस्कार प्राप्त सुनील अंबादासराव लुंगारे पाटील यांनी आपल्या पत्नीचा वाढदिवस गावातील प्रत्येक घरी गुलाबाचे झाड भेट देऊन साजरा केलाय. या उपक्रमाचे महाळसाकांत मठाचे मठाधिपती निळकंठ महाराज यांनी कौतुक केले आहे.

अनेक समाज उपयोगी उपक्रम स्वखर्चाने राबविले आहेत. त्यांनी नुकताच आपल्या पत्नीचा वाढदिवस गावातील प्रत्येक घरी गुलाबाचे झाडं व गावाला महाप्रसाद देऊन साजरा केला आहे. या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.

तालुक्यातील कहाळा बु. येथील रहिवासी असलेले व गावचे माजी सरपंच सौ प्रतिभा पाटील लुंगारे यांचे पतीराज समाजरत्न पुरस्कार प्राप्त सुनील पाटील लूंगारे यांनी गेल्या दहा वर्षा पासून स्वतःच्या खर्चातुन समाज उपयोगी विकास कामे करून गावचा गाडा चांगल्या प्रकारे सांभाळला असून गावातील सामाजिक बांधिलकी टिकवून ठेवण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे, जनावरांच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न असल्यामुळे हौदाचे वाटप, पाणपोई, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहेत 


Post a Comment

0 Comments