बरबडा :-किरण हणमंते
बरबडा येथे गुरुवर्य साईनाथ महाराज बितनाळकर (वसमतकर) यांचा व्यसन दहन निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने सर्व भक्त गण यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. तत्पुर्वी भक्ताच्या व्यक्तीने महाराज यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमांची सुरवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविक पि. जि. रुद्रवाड यांनी केले त्यानंतर अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्वांनी आपल्या मनोगतात महाराजांच्या कार्याविषयीं माहिती दिली त्यांनी कोरोना च्या काळात गरजूना मदत केली. त्यांनी समाजात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करीत असल्याचे सांगितले.
यामध्ये महाराजांनी आपल्या मनोगतात व भक्तांना उपदेश करीत असताना मी समाजाचा घटक म्हणुन सामाजिक बांधिलकी या नात्याने व्यसन मुक्ती करण्यासाठी कटींबद्ध असल्याचे सांगितले. आतापर्यंत सामाजिक व शैक्षणिक कार्यात स्वतःला वाहून नेले आणि यापुढे हि शेवटपर्यंत स्वतः समाजासाठी भक्तांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. सध्या मुदखेड, वसमत, रोहिपिंपळगाव या गावासहित अनेक गावांना दवाखान्यात रुग्णांना व नातेवाईक यांना डब्बे पुरविण्याचे काम करत असून यापुढेही हवे त्यांना डबे दिले
जातील असे सांगण्यात आले. यापुढील उदिष्ठ व्यसनमुक्ती च असल्याचे सांगितले. येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर त्याच दिवशी व्यसनमुक्ती दहन चा कार्यक्रम माहूर गडावर दसऱ्याला होणार असल्यामुळे सर्व भक्ताने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक गावागावात जाऊन कार्यक्रम घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.दसऱ्याच्या दिवशी त्या कार्यक्रमात सर्व व्यसन जसे कि, दारू, बिडी, तंबाखू, अशा सारख्या व्यसना पासुन मुक्त होण्यासाठी या व्यसनमुक्ती दहन दसऱ्याच्या दिवशी माहूर गडावर येण्याचे आवाहन महाराजांनी केले आहे. या कार्यक्रमांची सांगता आरती म्हणुन करण्यात आली आहे.

0 Comments