Header Ads Widget

" बरबडा प्रथमिक आरोग्य केंद्राची इमारत रुग्णाच्या सेवेत लवकर यावी वैद्यकीय अधिकारी डॉ पबीतवार "

 
   
       माधव पवार
आरोग्य विभागाच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या बरबडा येथील प्रथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत थोडक्यात मोडकळीस आली असल्यामुळे आरोग्य विभागाने गेल्या दोन ते तीन वर्षाखाली नूतन इमारत बांधकाम करण्यासाठी मंजुरी दिली असल्याने कोराना महामारीच्या कार्यकाळात चांगलीच खोंळबळी असली तरी सदरची इमारत पूर्ण करण्यासाठी गुत्तेदाराने मोठी कसरत करून नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असले तरी रुग्णाच्या सेवेत सदरची इमारत यावी असे वैद्यकीय अधिकारी डॉ पबीतवार यांनी सांगितले आहे
बरबड्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण परंतु दवाखान्यात लाइटिंग करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी नसल्यामुळे रुग्णाच्या सेवेत विलंब होत असल्याचे जनतेसह रुग्णातुन बोलल्या जात असून सदरची जुन्नी इमारत बऱ्याच पैकी मोडळीस आली असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे 

तालुक्यातील बरबडा आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागतील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मोठे असल्यामुळे व त्यांचे कार्यक्षेत्र ही मोठे असल्यामुळे या केंद्रा अंतर्गत पाच आरोग्य उपकेंद्र आहेत आरोग्य उपकेंद्र रुई बु, आरोग्य उपकेंद्र काहाळा, आरोग्य उपकेंद्र सोमठाणा, आरोग्य उपकेंद्र आंतरगाव, आणि प्रॉपर बरबडा असे उपकेंद्र असल्यामुळे सदरची नूतन इमारत रुग्णाच्या सेवेत येण्यासाठी आता प्रशासना कडून रेंगाळली असल्याची चर्चा असून सदरच्या गुत्तेदाराने इमारतीचे काम पूर्ण केल्याचे दिसून येत आहे
बरबडा येथील प्राथमिक आरोग्याच्या अंतर्गत लाइटिंग करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली नसल्यामुळे सदरचे काम खोंळबले आरोग्य विभागाने तात्काळ लाइटिंग करण्यासाठी मंजुरी दयावेत अशी मागणी केली जात असून प्रशासन दोन्ही बाजूनी घोडे नाचवत असते रुग्णासाठी नूतन इमारतील मंजुरी दिली असल्यामुळे गुत्तेदाराने सदरचे काम पूर्ण केले आणि आरोग्य विभागाने लाइटिंग करण्यासाठी मंजुरी दिली नसल्याने सदरचे काम इमरात पूर्ण होऊन सुद्धा रेंगाळले असल्याचे दिसून येत आहे 



Post a Comment

0 Comments