Header Ads Widget

माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहीम अधिक व्यापक करून सर्व सामान्य नागरिकांना लाभ द्या :- आमदार माधवराव पाटील जवळगावकर..


हिमायतनगर /-नागोराव शिंदे

 शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे दिनांक २६  सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सवात माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान ही मोहीम आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत आहे

उद्घाटन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना आमदार  हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना केल्या की मातृत्व सन्मान योजना शहरा सह तालुक्यात  अधिक व्यापक करून ह्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना व माता भगिनींना मिळून द्यावा यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन ही मोहीम अधिक व्यापक करावी असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ निमित्त आयोजित महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन संपन्न केले त्यानंतर हिमायतनगर शहरासह तालुक्यातील तळागाळातील नागरिकांन पर्यंत माता सुरक्षित तर घर सुरक्षित व मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान ही मोहीम अधिक व्यापक करून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ती पोहोचवावी असे आवाहन केले आहे

यासाठी त्यांनी उपस्थित असलेल्या आशा वर्कर्स व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी.डी.गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश वानखेडे गजानन सूर्यवंशी, गणेश शिंदे, बाला पाटील,शहराध्यक्ष संजय माने, योगेश चिल्कावार, ज्ञानेश्वर शिंदे, बाकी सेट ,काँग्रेस अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशी ,पंडित ढोणे,सह आशा सेविका व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


Post a Comment

0 Comments