हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरच्या मंगलमूर्तीची पोलीस ठाण्यातच स्थापना केली होती तालुक्यातील काही दिवसातच श्री गणेशाचे विसर्जन होत असल्याने पोलीस प्रशासनाने प्रथम पोलीस ठाण्यात बसवलेल्या गणरायाचे शांततेत हिमायतनगर तालुक्या पासून जवळच असलेल्या बोरीच्या रस्त्या लगत असलेल्या कनकेश्वर तलावात
तलावात श्री गणेशाचे विसर्जन पोलिसांच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती आमचे नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगरचे तालुका प्रतिनिधीनी सांगितले आहे
पोलीस ठाण्याच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री गणेशाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत स्वतः पोलीस प्रशासन डोक्याला फेटे व हातात टाळ घेऊन विसर्जनात तलीन झाल्याचे पोलीस कर्मचारी दिसून आले सदरचा आनंद पोलीस असले तरी काय झाले माणूस माणसाला माणूस की शिकवतो त्या मागचा असा उद्देश आहे पोलीस प्रशासनाने अतिशय शांततेत सदरच्या गणरायाचे विसर्जन केले त्या धर्तीवर तालुक्यातील गणेश मंडळाच्या अधिकाऱ्यानी पद अधिकाऱ्यानी केले पाहिजे या मागचा हिमायतनगर पोलिसाचा जनतेला महत्वाचा संदेश देऊन गेला आहे
हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील असलेल्या खेड्यापाड्यात काही दिवसात श्री गणेशाचे विसर्जन शांततेत पार पाडण्यात यावे या दृष्टिकोनातून पोलीस ठाण्यात बसवलेल्या श्री गणरायाचे प्रथम पोलिसांनी विसर्जन करून पुढील बंदोबस्तासाठी सज्ज झाले असल्याने इतर गणपतीचे शांततेत विसर्जन होण्यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भूसनूर यांनी तगडा पोलिस बंदोबस्त मागून घेतला असून गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments