Header Ads Widget

लोहा तालुक्यातील मौजे जोशी सांगवी येथे गोविंद प्रभूची जयंती साजरी !!


शिराढोण : शिवकांत डांगे - 

लोहा तालुक्यातील जोशी सांगवी येथे गोविंद प्रभू यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली असून या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात महिला भाविक व वर्ग मोठया संख्येने उपस्थितीत होत्या श्री क्रष्ण ज्ञान मंदिर येथे दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजी महंत श्री सुजानमुनी अंकुरणेकर यांच्या मार्ग दर्शनाखाली महानुभाव पंथाच्या मंडळीनीसर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशब्दी तथा श्री गोविंदप्रभु अवतार दिन यावेळी साजरा करण्यात आला आहे 
यावेळी गावातील मुख्य रस्त्याने शोभा यात्रा काढण्यात आली त्यात चिमुकल्या बाल गोपाळनी अंगावर साड्या परीधान करुन डोक्यावर कळस घेतला  शोभा यात्रेची शोभा वाढवली या मिरवणुकित गावतील भक्तागनासह परिसरातील भाविक भक्त उपस्थीत होते हे विशेष आहे 
गोविंद प्रभू अर्थात गुंडम राऊळ  यांचा जन्म  काठसुरे -वऱ्हाड येथे इ.स.११८७, इ.स. १२८५,८६ हे महानुभाव संप्रदायातील एक गुरू होते ते काण्व शाखीय ब्राह्मण होते महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतार स्वरूप चक्रधर स्वामी यांचे ही ते गुरू होते त्यांचे वास्तव्य अमरावती जवळील ऋद्धिपूर इथे होते पंढरपूरला जेव्हा वारकरी पंथाचा उदय झाला त्याच सुमारास ऋद्धिपूरला महानुभाव पंथाचा प्रारंभ झाला  गोविंद प्रभू त्या पंथाचे आद्य पुरुष होते

Post a Comment

0 Comments