Header Ads Widget

नायगाव च्या जनतेच्या "मनाचा राजा" असलेल्या सार्वजनिक मंडळ गणेशाचे वेळेच्या आत विसर्जन गणेश विसर्जन वेळी प्रशासकीय अधिकारी हजर नसल्याने चर्चेला उधान -

नायगाव विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे - 

नायगाव येथील सर्वांच्या नवसाला पावणारा व नायगाव सह परिसरातील भक्तांच्या मनातील मानाचा राजा असलेल्या सार्वजनीक गणेश मंडळाचे विसर्जन सायंकाळी ठीक सव्वा सात वाजता बरोबर वेळेच्या आत करण्यात आले.विसर्जनाच्या वेळी नायगाव तहसील व नगरपंचायतचा एक ही आधिकारी उपस्थित न राहता नायगावच्या इतिहासात पहिल्यांदा श्री चे विसर्जन या मुळे प्रशासनाला विसर्जनाचे वावडे का? असा सवाल गणेश भक्तातून विचारला जात आहे 
नायगाव शहरात सर्वांच्या मनाचा व मानाचा  समजल्या जाणाऱया सार्वजनिक गणेश मंडळाची पालखी भजनी मंडळी व गणेश भक्त यांना घेऊन उल्हासमय वातावरणात शिवाजी चौक, नगरपंचायत,विठ्ठल हनुमान मंदिर,जुने गाव,जिजाऊ चौक,नेताजी सुभाषचंद्र चौक,महात्मा फुले कॉलनी,बसस्थानक,डाँ हेडगेवार चौक, मार्गे गणेश विसर्जन स्थळ येथे नदी काठावर नेण्यात आली
पालखीतील गणपतीला पूजन करून आरती ओवळणे व नारळ फोडण्याची प्रथा अविरत चालू आहे.सदर गणपती अनेक महिला भगिनी व गणेश भक्त यांची इच्छा पूर्ण करतो अशी ख्याती आहे. या मानाच्या गणपतीची आरती मानकरी गंजेवार परिवार,व नगर पंचायत पदाधिकारी माजी आ. चव्हाण व प्रशासकीय आधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी यांच्या हस्ते करण्याचा मान आजतागायत चालू आहे 
या वेळी पृकृती आस्वस्थे मुळे माजी आ.चव्हाण विसर्जन वेळी हजर नव्हते पण त्यानी पूजन करून व पालखीला खांदा देऊन आपले कर्तव्य पार पाडले. त्यांचा आरतीचा मान विजय चव्हाण व हणमंत चव्हाण,व इतर चव्हाण यांनी सांभाळला तर तहसीलदार गजानन शिंदे व नायब तहसीलदार लोंढे हे नायगाव शहरात राहूनही गणेश विसर्जनाला हजर नव्हते.तर नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी भोसीकर व प्रशासकीय अधिकारी संतराम  जाधव अनेक दिवसांपासून  येथील कारभार करतानाही गणेश विसर्जनाच्या वेळी मात्र रामभरोसे व्यवस्था सोडून देऊन गैर हजर होते.
   
या विषयी तहसीलदार शिंदे यांना संपर्क केला असता त्यांनी आपण इतरत्र व्यवस्थेतअडकलो होतो व मंडळाधिकारी हजर होते असे सांगितले तर प्रभारी मुख्याधिकारी यांनी नेहमीच्या सवयी प्रमाणे फोन उचलला नाही या मुळे उपस्थित गणेश भक्तांमध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनते बद्दल तीव्र नापसंती व्यक्त होत होती 

ते नगर पंचायतचे कर्मचारी यांनी वेळ निभावून नेली. विसर्जन स्थळी नगर पंचायत च्या वतीने चोख व्यवस्था व प्रकाश व्यवस्था  सुंदर केली होती.पण अधिकार्या विना नायगावच्या इतिहासात गणेश विसर्जन पहिल्यांदाच पार पडले हे विशेष असून या बाबद जिल्हाधिकारी यांच्या कडे गणेश भक्त गार्हाणे मांडणार असे कळते.

Post a Comment

0 Comments