Header Ads Widget

विध्यार्थीच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी माजी शाखाधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षा रोपणा बरोबर शाळेच्या विद्यार्थीना शालेय साहित्याचे वाटप -

      माधव पवार
नायागांव तालुक्यातील कोकलेगावचे रहिवाशी व भूमिपुत्र तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कुंटूरचे माजी शाखाधिकारी एम आर हंगरगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील विध्यार्थीचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलेगाव येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिली ते सातवीच्या विध्यार्थी बरोबर तीन अंगणवाडीतील बालकांना विशेष मान्यवरांच्या उपस्थित शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम सकाळी ठीक आकरा वाजता कोकलेगाव येते संपन्न झाला आहे
तालुक्यातील कोकलेगावचे भूमीपुत्र तत्कालीन शाखाधिकारी एम आर हंगरगे यांच्या ५९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे विद्यमान अध्यक्ष गावचे माजी सरपंच शंकरराव देशमुख हे होते विचार मंचावर गजानन पाटील जुन्ने, सरपंच प्रतिनिधी हांनमतराव मिरकुटे, माजी शाखा अधिकारी एम आर हांगरगे, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष जावेद शेख,लव्हाजी नारे, गिरीधर पाटील आनंदराव शिंदे, शिवा हांगरगे आदी यावेळी उपस्थित होते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलेगाव येथील शाळेतील एकूण विध्यार्थी व मुली अशा १५६ विध्यार्थीना आणि तीन अंगणवाडीतील छोटया बालकांना वह्य पेना व पुष्पगुच्छ देऊन विध्यार्थीचा सन्मान करण्यात आला त्याच बरोबर एकविस वेगवेगळ्या वृक्षाचे वृक्षा रोपण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी एम कारताळे, सहशिक्षक सीताराम दत्तू पंत पाटील, भंडरवाड, पोपूलवार, राठोड, कादरी मॅडम, झुंजारे मॅडम आणि अंगणवाडी च्या सर्व मॅडम वर्ग उपस्थित होत्या यावेळी शाळेतील विध्यार्थीनी मान्यवरांचे गीत गाऊन स्वागत केले आहे




Post a Comment

0 Comments