हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हदगाव : मोजे रुई गावातील विद्युत प्रश्न,एसटी बस प्रश्न, वानरांचा त्रास या प्रमुख मागण्या सोडवण्यासाठी रुई येथील सरपंच अमोल पाटील रुईकर, उपसरपंच भीमराव वाढवे हे दिनांक 30 ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत रुई ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व गावकऱ्यांच्या वतीने विद्युत वितरण कंपनी ,आगार व्यवस्थापक ,वनपरिक्षेत्र, कार्यालयासह तहसीलदार जीवराज डापकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे अनेक वेळा मागणी केली होती,
एका वर्षापासून कोणत्याच विभागाने प्रतिसाद दिला नसल्याने अखेर दिनांक 30 ऑगस्ट रोजी हदगाव तहसील कार्यालयासमोर नाईलाजाने आमरण उपोषणाला बसले आहेत
परंतु संबंधित सर्व विभागाला रुई येथील सरपंच अमोल पाटील रुईकर उपसरपंच भीमराव वाढवे यांनी ग्रामपंचायती सदस्य व गावकऱ्यांच्या वतीने उपोषणाला बसले आहेत आतापर्यंत तीन दिवस उलटून गेली आहे तरीही कुठल्याच संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिलेली नाही..
रुई येथील विद्युत वितरण कंपनीच्या जुन्या तारा निकामी झाल्याने व विद्युत पोलसह विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत विद्युत वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे गावात अप्रिय घटना घडली होती दुसरी घटना घडू नये यासाठी संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात होती तर गावातील शालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना हदगाव कडे येजा करण्यासाठी एसटी बस नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत संबंधित विभागाने लक्ष देऊन रुई येथील प्रवाशासह शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संबंधित विभागाने रुई येथे एसटी बस सुरू करण्याची मागणी केली होती व तसेच गावात वानरांचे धुमाकूळ घातला असून गावकरी वानरांच्या त्रासाला कंटाळले असल्याने सबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी ही केली

0 Comments