Header Ads Widget

गणेशोत्सवाच्य पार्श्वभूमीवर नायगाव पोलिसांचे पोलीस फौज फाट्यासह जोरदार प्रदर्शन

मधुकर जवळे / मारोती कोपलंवार 

नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोद जी शेवाळे, विभागीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, यांच्या मार्गदर्शनाखाली व  नायगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक  अभिषेक शिंदे यांच्या नियोजनात नायगाव पोलिसांचे पथसंचलन    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायगाव पोलिसांनी दिनांक 31 ऑगस्ट रोजी नायगांव शहरातील  मुख्य रस्त्याने   पार पडले. यावर्षीचा गणेशोत्सव हा अत्यंत उत्साहात निर्विघ्नपणे पार पाडावा या अनुषंगाने नायगांव पोलिसांनी पथसंचलन करत कायदा-सुव्यवस्थेकडे आपलं लक्ष केंद्रीत केले आहे.
यावेळी बिलोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चित चांडक, नायगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  अभिषेक शिंदे यांसह  ठाण्याचे कार्यरत  पोलिस कर्मचारी, एसआरपी जवानांची एक तुकडी, होमगार्ड असा मोठा फौजफाटा सहभागी होता या पथ संचालनाद्वारे सद्यस्थितीत चालू असलेल्या गणेशोत्सव कार्यकाळात तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर नायगाव पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. 
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची परिपूर्ण काळजी  नायगांव पोलिसां कडून घेतली  जाणार आहे. त्याच धरतीवर नायगाव पोलिसांकडून पथ संचालन जोरदार पणे नायगाव शहरात घेण्यातनायगांव तालुका प्रतिनिधी:-  नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोद जी शेवाळे, विभागीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, यांच्या मार्गदर्शनाखाली व  नायगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक  अभिषेक शिंदे यांच्या नियोजनात नायगाव पोलिसांचे पथसंचलन  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायगाव पोलिसांनी दिनांक 31 ऑगस्ट रोजी नायगांव शहरातील  मुख्य रस्त्याने पार पडले.
यावर्षीचा गणेशोत्सव हा अत्यंत उत्साहात निर्विघ्नपणे पार पाडावा या अनुषंगाने नायगांव पोलिसांनी पथसंचलन करत कायदा-सुव्यवस्थेकडे आपलं लक्ष केंद्रीत केले आहे.यावेळी बिलोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चित चांडक, नायगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  अभिषेक शिंदे यांसह  ठाण्याचे कार्यरत  पोलिस कर्मचारी, एसआरपी जवानांची एक तुकडी, होमगार्ड असा मोठा फौजफाटा सहभागी होता.

या पथ संचालनाद्वारे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर नायगाव पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.  गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची परिपूर्ण काळजी  नायगांव पोलिसां कडून घेतली  जाणार आहे त्याच धरतीवर हे पोलिसांचे हे पथ संचालन जोरदार पणे नायगाव शहरात घेण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments