Header Ads Widget

भानुदास बोकारे यांची सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती.


बरबडा/प्रतिनिधी : भगवान शेवाळे -

ऐन सणासुदीच्या काळात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना बढती मिळाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांत सध्या आनंदाच वातावरण आहे. सोनखेड पोलीस ठाण्यातील जमादार भानुदास बोकारे यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. सोनखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.डी.भोसले यांच्यासह ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी बोकारे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत 
एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले भानुदास बोकारे यांनी आपले शालेय शिक्षण नांदेड येथे पूर्ण केले आहे.जमादार असताना अनेक गंभीर प्रकरण हाताळून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला आहे. त्यांच्या शिस्तप्रिय व नियमबद्ध वागणुकीमुळे त्यांना ही पदोन्नती मिळाली असून त्यांच्या बढतीमुळे त्यांच्या मित्र परिवारा कडून त्यांच अभिनंदन करण्यात येत आहे.
गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरीकांना मदत घेण्यास अधिक सुलभता येईल पोलीस दल सक्षम बनण्यासाठी जनतेचे रक्षण सार्वजनिक माल मत्ते नुकसान टाळण्यासाठी अधिकाऱ्या कडून सुधारण्यास मदत होणार असल्यामुळे पोलीस दलास सद्य:स्थितीत प्रत्यक्ष कामकाजा करिता मिळणाऱ्या मनुष्य दिवसांमध्ये मोठी वाढ होईल आणि गुन्हे उघडकीस येण्यासाठी मोठी मदत होणार असल्यामुळे ग्रहखात्या काडुन पोलिसांना बाढ दिल्या जातात आणि गुन्हे रोखण्यासाठी सुद्धा मोठी भरीव वाढ होणार आहे.



Post a Comment

0 Comments