Header Ads Widget

भोकर पोलीस ठाण्यातील सोनाजी कानगुले यांना पदोन्नती

      गोविंद नरसीकर 
भोकर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा-यास पदोन्नति मिळाली आहे. सोनाजी जळबाजी कानगुले यांना नुकतीच पोलीस हेड काॅनिस्टेबल म्हणून पदोन्नती मिळाली आहे. याबद्दल अर्धापुर च्या उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील व भोकर पोलीस ठाण्याचे पोनि विकास पाटील यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बॅज लावून कौतुक केले आहे.
विविध गुन्ह्यांची उकल होण्यास तसेच सामान्य नागरीकांना मदत घेण्यास अधिक सुलभता येईल पोलीस दल सक्षम बनण्यासाठी जनतेचे रक्षण सार्वजनिक माल मत्ते नुकसान टाळण्यासाठी अधिकाऱ्या कडून सुधारण्यास मदत होणार असल्यामुळे पोलीस दलास सद्य:स्थितीत प्रत्यक्ष कामकाजा करिता मिळणाऱ्या मनुष्य दिवसांमध्ये मोठी वाढ होईल आणि गुन्हे उघडकीस येण्यासाठी मोठी मदत होणार असल्यामुळे ग्रहखात्या काडुन पोलिसांना बाढ दिल्या जातात आणि गुन्हे रोखण्यासाठी सुद्धा मोठी भरीव वाढ होणार आहे.
सोनाजी कानगुले हे सलग २२ वर्षाच्या सेवेनंतर त्यांना पोलीस हेड काॅनिस्टेबल या बदावर बढती मिळाली आहे. याप्रसंगी अर्धापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, पोनि विकास पाटील, सपोनि रसुल तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक राणी बोंडवे,पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे सह ठाण्यातील पोलीस कर्मचारी, पञकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments