बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे भोपाळ येथील एका तलावात श्री गणेशाचे विसर्जन करण्यासाठी गणेश मंडळाचे अधिकारी व पदाधिकारी गेले होते श्री गणेशाचे तळ्यात विसर्जन केल्याच्या नंतर सर्व कार्यकर्ते घराकडे परतत असताना काही मुले सदरच्या तळ्यात पोहण्यासाठी उतरले होते परंतु सदरचा बावीस वर्षीय तरुण मयत राजेश बाबुराव हत्तीनगरे यांनी सुद्धा तळ्यात पोहण्यासाठी उडी मारला आणि गाळत फसल्यामुळे मृत्यू झाला आहे
सदरची घटना नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांना कळताच सपोनि संकेत दिघे यांच्यासह पोलीस कर्मचारी तलाठी विजय पाटील घटनास्थळी भेट दिली आणि रामतीर्थ पोलिसांनी सदरच्या घटनेचा पंचनामा करून प्रेत ताब्यात घेऊन शेवविच्छेदन करण्यासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणले व आई वडीला लाडाचा मुलगा पाण्यात बुडून मृत्यू पावल्यामुळे मोठा धक्का बसला व त्यांचा जिवनातील आधार उडाला असल्यामुळे भोपाळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
भोपळा गावातील श्री गणेशाचे विसर्जन अतिशय शांततेत पार पडले परंतु विसर्जन संपल्याच्या नंतर सदरचा युवक हा तळ्यात पोहण्यासाठी पाण्यात उडी मारल्यामुळे गाळे मध्ये गच्च अडकला असल्याने त्यांचा तळयातच मृत्यू झाल्याची घटना दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत वसंतराव दिघे यांनी सांगितले आहे
रामतीर्थ ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या भोपळा गावात घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी मानली जात असून सदरच्या युवकाला अनेक तरुणाने तुला पोहता येत नाही तु पाण्यात येऊ नकोस असे अनेक वेळा सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत असून सदरचा युवक हा कोणाचे ही ऐकून न घेता सदरच्या तळ्यात उडी मारून पोहाण्याचा प्रयत्न केला असता थेट गाळत फसल्यामुळे तो मधेच अडकून मृत्यू पावला असल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी सांगितले आहे

0 Comments