हिमायतनगर : नागोराव शिंदे -
हिमायनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथे डेंगूच्या रुग्णाचे संकेत ? मिळत असल्यामुळे नागरिकानी खबरदारी बरोबर घाबरू नये असे आवाहन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ गोविंद वानखेडे यांनी केले असून डेंगूच्या रुग्णाची स्थिती स्थिर असल्यामुळे कोणत्या नागरिकानी चिंता करण्याचे कारण नाही त्यासाठी आरोग्य विभाग अगदी सक्षम असल्यामुळे सदरचा डेंगूचा रोग आटोक्यात येण्यासाठी काही वेळ लागत नसल्याचे डॉक्टरानी सांगितले आहे
समुदाय आरोग्य अधिकारी. नाईक साहेब, श्री रामदास ढोकळे,श्रीकांत राठोड, गायकवाड, माधव वांगजे श्रीमती सुर्यवंशी, आशा ताई शारदा वानखेडे,डॉ पोहरे साहेब तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पळसपुर येथे संकेत डेंगू रुग्णाची परिस्थिती स्थिर रुग्णावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे डॉक्टर गोविंद वानखेडे यांनी आवाहन केले आहे
डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप हाडमोडी ताप हा एक विषाणूजन्य रोग असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला डेंगू असल्यास त्यांचे निदान झाले तर त्या व्यक्तीला आजारी असताना डास चावणार नाही यांची काळजी घ्यावी लागते कारण त्या व्यक्तीला डास चावला तर संसर्ग पसरू शकतो यामुळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार असले तरी आरोग्य विभाग सक्षम असल्यामुळे गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी व घाबरून नये कारण सारी आरोग्य विभागाची यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करणार आहे

0 Comments